भाजप खासदाराने राजस्थानच्या ऐतिहासिक अमागड किल्ल्यावर फडकावला ध्वज, काँग्रेस सरकारने केली अटक


डॉ. किरोडीलाल मीणा यांना अमागढ किल्ल्यात पूजा करायची होती, पण पोलिसांनी त्यांना तिथे जाण्यास आधीच बंदी घातली होती. त्यांनी ध्वज फडकावल्याचे निमित्त करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. Rajasthan BJP MP hoists flag over historic Amagadh fort, MP arrested


विशेष प्रतिनिधी

जयपूर : भाजप खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांना राजस्थानच्या जयपूरमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मीणा यांनी अमागढ किल्ल्यावर ध्वज फडकवल्याचा आरोप आहे.

डॉ. किरोडीलाल मीणा यांना आमगढ किल्ल्यात पूजा करायची होती, पण पोलिसांनी त्यांना तिथे जाण्यास आधीच बंदी घातली होती.  मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात आधी कॉंग्रेसचे आमदार रामकेश मीणा यांनी यापूर्वी कथितरीत्या अमागढ किल्ल्यावर भगवा ध्वज फाडल्याचा आरोप आहे. यानंतर हे प्रकरण पेटले होते.



यानंतर पुन्हा भाजप खासदार किरोडीलाल मीणा यांनी अमागढ किल्ल्यावर मीणा समाजाचा झेंडा फडकवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला असला तरी अपयशी ठरले. यानंतर पोलिसांना त्यांना अटक करावी लागली. खासदार मीणा यांना अटक झाल्यावर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वसुंधरा राजे यांनी या प्रकरणावर ट्वीट केले आणि लिहिले की, आमगढ किल्ल्याच्या बाबतीत धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या काँग्रेसला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या डॉ. किरोडीलाल मीणा जी यांची अटक निंदनीय आहे .डॉ मीणा यांची तत्काळ सुटका करावी.

Rajasthan BJP MP hoists flag over historic Amagadh fort, MP arrested

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात