Raj Kundra Case : पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेला ४ आठवड्यांची स्थगिती


बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीप्रकरणी दिलासा मिळाला आहे. अटकपूर्व जामीन मागणाऱ्या कुंद्राच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारला नोटीसही बजावण्यात आली आहे. Raj Kundra Case Relief to Raj Kundra in Pornography Case, Supreme Court Arrests 4 Weeks Postponed


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीप्रकरणी दिलासा मिळाला आहे. अटकपूर्व जामीन मागणाऱ्या कुंद्राच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारला नोटीसही बजावण्यात आली आहे. याप्रकरणी आपल्याला अटक करण्यात आल्याचे राज कुंद्रा यांनी न्यायालयाला सांगितले होते. याप्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता याच प्रकारची आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या कुटुंबासाठी मागील काही काळ खूप कठीण गेला आहे. पॉर्नोग्राफीप्रकरणी अटक होऊन सुटका झाल्यानंतर राज कुंद्रा यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. शिल्पा शेट्टीच्या पतीवर अश्लील चित्रपट बनवण्याचा आणि ते मोबाईल अॅपद्वारे प्रसारित केल्याचा गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये राज कुंद्रा 60 दिवस तुरुंगात राहिला, राज कुंद्राला 60 दिवसांनंतर कोर्टातून जामीन मिळाला होता.

25 नोव्हेंबर रोजी राज यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला, त्यानंतर राज यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राज यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, ज्या व्हिडिओंबद्दल बोलले जात आहे त्यात कोणतीही शारीरिक किंवा प्रौढ सामग्री दाखवलेली नाही.



यासोबतच बोल्ड व्हिडीओ बनवणे आणि प्रसारित करणे यात आपला अजिबात सहभाग नसल्याचेही राज यांनी सांगितले. या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा राज यांनी केला आहे. या प्रकरणात पूनम पांडे, शर्लिन चोप्रा या कलाकारांचाही सहभाग आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखेने जुलैमध्ये राजला अटक केली होती. हॉटशॉट्स अॅपच्या माध्यमातून अॅडल्ट कंटेंट दाखवून त्याची विक्री केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर सप्टेंबरमध्ये राजला ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला.

अटकेनंतर राजने मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता, ज्यामध्ये त्याने दावा केला होता की हॉटशॉट अॅपद्वारे चुकीचा आणि घाणेरडा मजकूर कधीही दाखवला गेला नाही. राज यांनी असेही म्हटले होते की, कोणतीही प्रौढ सामग्री तयार करण्यात आणि अपलोड करण्यात त्यांचा हात असल्याचा कोणताही पुरावा नाही.

Raj Kundra Case Relief to Raj Kundra in Pornography Case, Supreme Court Arrests 4 Weeks Postponed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात