‘राहूल गांधी अविवाहित, म्हणून तर ते फक्त मुलींच्याच कॉलेजमध्ये जातात.. मुलींनी त्यांच्याजवळ टाळावे..’ केरळमध्ये डाव्यांच्या माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

राहूल गांधी हे अविवाहित आहेत. त्यामुळे मुलींनी त्यांच्याजवळ टाळायला हवे, असे वादग्रस्त वक्तव्य डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले माजी खासदार जोएस जॉर्ज यांनी केले आहे. Rahul Gandhi unmarried, girls should avoid him, controversial statement of former MP


विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपुरम : राहूल गांधी हे अविवाहित आहेत. त्यामुळे मुलींनी त्यांच्याजवळ टाळायला हवे, असे वादग्रस्त वक्तव्य डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले माजी खासदार जोएस जॉर्ज यांनी केले आहे.

केरळमध्ये एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना जॉर्ज म्हणाले, ते केवळ मुलींच्या महाविद्यालयात जातात. ते मुलींना उभं राहण्याची आणि खाली वाकण्याची ट्रेनिंग देतात. माझ्या बाळांनो, त्याच्या जवळ जाऊन उभं राहणं – झुकणं शिकायचं नाही, तो अविवाहीत आहे… मुलींनी त्यांच्याजवळ जाणं टाळायला हवे. राहुल गांधी यांच्या दौºयाचे आयोजन अशापद्धतीने करण्यात आले आहे की, ते केवळ विद्याथीर्नी असणाºया कॉलेजेला भेट देतात. तिथे ते मुलींना वाकण्यासंदर्भात शिकवण देतात.इडुक्कीचे माजी खासदार जोएस जॉर्ज हे डाव्यांचे उमेदवार आणि सद्य मंत्री एम एम मणि यांच्यासाठी प्रचार करत होते. याच दरम्यान त्यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस आक्रमक झाली असून, जॉर्ज यांनी मयार्दा ओलांडल्याची टीका केली जात आहे. लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंटच्या पाठिंबाव्यावर जॉर्ज अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. सीपीआयला पराभव दिसू लागल्याने राहुल यांच्याबद्दल अशी वक्तव्य केली जात असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसकडून एक ट्विटही करण्यात आले आहे.

Rahul Gandhi unmarried, girls should avoid him, controversial statement of former MP

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*