आपली लढाई भाजपाशी आहे की भारताशी हे राहुल गांधींनी ठरवावे – धर्मेद्र प्रधान

petrol and diesel price hike Dharmendra Pradhan said – Rahul Gandhi should answer, why it is so expensive in Congress ruled states

राहुल गांधी वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये मुस्लीम लीग बाबत विधान केलं होतं.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी अमेरिकेत मुस्लिम लीगवर केलेल्या वक्तव्यामुळे देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मुस्लीम लीगचे वर्णन पूर्णपणे धर्मनिरपेक्षतावादी पक्ष असे केले आहे. त्यांच्या या विधानावर आता  भाजपा नेत्यांकडून टीका टिप्पणी सुर झाली आहे. Rahul Gandhi should decide whether his fight is with BJP or with India  Dharmendra Pradhan

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसने स्पष्ट करावे की त्यांची लढाई भाजपाशी आहे की भारताशी? असं पते म्हणाले आहे.

मोदी सरकारमधील शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचे कॅबिनेट मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट केले आहे की, “राहुल गांधींना देशाबाहेर देशाचा अपमान करण्याची सवय झाली आहे. ते जेव्हाही परदेशात जातात तेव्हा भारत आणि तेथील लोकशाहीबद्दल अपमानास्पद वक्तव्ये करतात. आज संपूर्ण जगात भारताची विश्वासार्हता नवनवीन उंची गाठत असताना, जग भारताकडे आशेने पाहत आहे, अशा वेळी राहुल गांधी यांनी भारताला परदेशी भूमीपेक्षा कमी दर्जाची दाखविलेली विधाने अत्यंत दुर्दैवी आहेत.’’

राहुल गांधी काय म्हणाले? –

राहुल गांधी वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये पोहोचले. येथे त्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान राहुल यांना केरळमध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) सोबत काँग्रेसच्या युतीबाबत विचारले असता राहुल म्हणाले, मुस्लीम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यात नॉन सेक्युलर असे काहीही नाही. वास्तविक, इंडियन युनियन मुस्लीम लीग केरळमधील काँग्रेस आघाडीचा भाग आहे.

Rahul Gandhi should decide whether his fight is with BJP or with India  Dharmendra Pradhan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात