Between the lines : राहुल गांधींची खासदारकी रद्द; उभरत्या तिसऱ्या आघाडीला लावले नख; मोदींनी निवडला खरा “स्पर्धक”!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. त्याचे कायदेशीर परिणाम काय व्हायचे ते होवोत, पण राहुल गांधी या निमित्ताने राजकीय दृष्ट्या शहीद झाले आहेत आणि त्यांच्या शहादतचा राजकीय फायदा घेण्यासाठी काँग्रेस पुढे सरसावली आहे. काँग्रेस देशभरात राजकीय रान पेटवत आहे. हे रान पेटवल्याचा काँग्रेसला किती फायदा होईल आणि राजकीय घटनाक्रम कशी वळणे घेईल??, हे नंतर समजेल. पण राहुल गांधींची खासदारकी रद्द होण्याच्या राजकीय घटनेतले “बिटवीन द लाईन्स” नीट वाचले, तर काही वेगळ्याच बाबी समोर येताना दिसतील.Rahul Gandhi disqualified from loksabha; big blow to third front, modi choose his “real rival”

 प्रादेशिक नेत्यांच्या हालचालींना धक्का

गेल्या काही दिवसांमध्ये भारतातल्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या काही वेगळ्या हालचाली सुरू होत्या. काँग्रेसला वगळून सर्व प्रादेशिक पक्षांची एकजूट करण्याचा राजकीय घाट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे प्रादेशिक नेते घालत होते. त्यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांची साथ मिळण्याची दाट शक्यता होती. याचा अर्थ काँग्रेसला वगळून देशभरात मोदी विरोधात तिसरी आघाडी उभी राहू पहात होती. राहुल गांधींच्या खासदारकी रद्द होण्याने प्रादेशिक पक्षांच्या तिसऱ्या आघाडीच्या एकजुटीच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. कारण राहुल गांधींच्या डिस्क्वालिफिकेशन मुळे नाईलाजाने का होईना पण प्रादेशिक पक्षाच्या सर्व नेत्यांना त्यांच्या मागे उभे राहावे लागले आहे.



 राजकीय टेम्पो टिकवून ठेवण्याचे आव्हान

आता काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या राजकीय हौतात्म्याचा फायदा किती करून घेतील आणि तो विषय पुढे किती दिवस रेटून येतील हे पाहणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच प्रादेशिक नेत्यांची त्यांना साथ किती दिवस मिळत राहील हेही पाहणे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे कारण आज निर्माण झालेला “राजकीय टेम्पो” पुढचे काही महिने टिकवून ठेवणे हे फार जिकरीचे आहे. वेगाने बदलणाऱ्या राजकीय घटनाक्रमात हे फार मोठे आव्हान आहे!!

 मोदींनी निवडला खरा स्पर्धक!!

पण “बिटवीन द लाईन्स” मधला आणखी एक मुद्दा त्याहीपेक्षा वेगळा आहे, तो म्हणजे राहुल गांधींना लोकसभेच्या सदस्यत्वापासून बाजूला काढून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील स्वतःचा “खरा स्पर्धक” निवडला आहे. युद्धाची भूमी निवडणे, काळ निवडणे आणि शत्रू निवडणे हे कसलेल्या सेनापतीचे खरे रणकौशल्य मानले जाते आणि त्या रणकौशल्याच्या आधारावर मोठ-मोठी युद्ध ही जिंकली जातात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निवडणुकीच्या काळ निश्चित आहे. रणमैदानही निश्चित आहे, प्रश्न फक्त आपला खरा राजकीय शत्रू निवडण्याचा होता. प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी आणि काँग्रेस स्वतंत्रपणे आपल्या अंगावर घेणे, की राहुल गांधी यांच्यासारख्या नेतृत्वा भोवती विरोधकांचे ऐक्य घडवून सर्व विरोधकांना आपल्या अंगावर घेणे हा “राजकीय चॉईस” मोदींपुढे होता. मोदींनी यातला “दुसरा चॉईस” निवडला आहे!!

 2024 ची लढाई कोण जिंकणार??

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याच्या राजकीय खेळीत उभारती तिसरी आघाडी जवळजवळ वाहून गेली आहे. सर्व प्रादेशिक नेत्यांना निदान आज तरी राहुल गांधी यांच्या भोवती उभे राहणे भाग पडले आहे. त्यामुळे राहुल गांधींचे नेतृत्व बाकीच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या तुलनेत “उंच” ठरले आहे. त्यामुळेच मोदींना 2024 चा सामना राहुल विरुद्ध मोदी असाच रंगवणे शक्य होणार आहे. तो तसा रंगला, तर 2024 ची लोकसभा लोकसभेची लढाई कोण जिंकेल??, हे समजणे फारसे अवघड नाही!!

Rahul Gandhi disqualified from loksabha; big blow to third front, modi choose his “real rival”

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात