मन की बात @100 : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारतीय परंपरेनुसार गुरूंना वंदन करूनच शतकपूर्तीला प्रारंभ!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनावर भारतीयत्वाचे संस्कार किती घट्ट आहेत, हे अनेकदा दिसते. पण त्यांच्या मनाचा सर्वात जवळचा कार्यक्रम असलेल्या मन की बात मधून आज त्याचा विशेषत्वाने प्रत्यय आला. भारतीय परंपरेला अनुसरूनच गुरूंना वंदन करून त्यांनी मन की बातच्या शतकपूर्तीचा प्रारंभ केला. मन की बात मध्ये सुरुवातीलाच त्यांनी आपले प्रेरणास्थान असलेल्या लक्ष्मणराव इनामदार यांच्याकडून आपण काय शिकलो आणि त्यानुसार कशी वाटचाल करतो आहोत, याचे वर्णन केले आणि त्यानंतर अर्थातच आपल्या मनाला भावलेल्या जवळच्या विषयांकडे ते वळले. त्यांनी मन की बातच्या 100 एपिसोडचा आढावा घेताना काही निवडक प्रेरक व्यक्तींशी बातचीतही केली. त्यामध्ये अर्थातच त्यांनी मेक इन इंडिया, स्वच्छता अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान यांचा उल्लेख केला, ज्याने सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनात फार मोठा फरक घडवून आणला आहे.Prime Minister Narendra Modi started the centenary by saluting the Guru as per Indian tradition

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा 100 वा एपिसोड झाला. भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक ठिकाणी याचे प्रसारण सुरू होते. लंडनपासून युएन मुख्यालयापर्यंत याचे प्रसारण झाले. देशभरात बूथ पातळीवर एपिसोडचे लाइव्ह ब्रॉडकास्ट करण्यासाठी 400000 सेंटर्स भाजपने तयार केली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० ठिकाणी लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम ऐकला.



पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :

मला या कार्यक्रमाने तुमच्यापासून दूर होऊ दिलं नाही. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांशी बोलणं, भेटणं व्हायचं. पण पंतप्रधान झाल्यानंतर इथलं आयुष्य वेगळं आणि काम वेगळं, जबाबदारी, अनेक प्रोटोकॉल, वेळेची मर्यादा आहेत. सुरुवातीला रिकामं वाटायचं. ५० वर्षांपूर्वी घर यासाठी नव्हतं सोडलं की आपल्याच लोकांशी संपर्क कमी होईल. मन की बातने मला सामान्य माणसाशी जोडण्याचा मार्ग दिला. पदभार, प्रोटोकॉल व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला असं मोदींनी म्हटलं.

मन की बातमध्ये याआधी ज्या लोकांचा उल्लेख केला ते असे हिरो आहेत ज्यांनी या कार्यक्रमाला जिवंत बनवलंय. आज आपण शंभराव्या एपिसोडचा टप्पा गाठला. या निमित्ताने पुन्हा एकदा या सर्व हिरोंशी बोलून त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. आज आपण अशाच काही सहकाऱ्यांशी बोलणार असल्याचं मोदींनी सांगितलं.

मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पराग अळवणी आणि खासदार पूनम महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजपच्या सहकारी पक्षांनीही हा कार्यक्रम ऐकण्याचं आवाहन नागरिकांना केले. महिन्याच्या अखेरच्या रविवारी या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते.

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करतात. विजयादशमीच्या मुहूर्तावर 3 ऑक्टोबर 2014 रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. याआधीचा एपिसोड २६ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता. मन की बात हा कार्यक्रम दर महिन्याच्या रविवारी ऑल इंडिया रेडिओवरून प्रसारीत होणारा कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. ज्याचं प्रसारण डीडी नेटवर्कवरही केलं जातं.

आज 30 एप्रिल रोजी याचे 100 एपिसोड पूर्ण झाले. त्याआधी पीएम मोदींच्या या मन की बातचा देशावर नक्की काय परिणाम झाला, याचा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.

Prime Minister Narendra Modi started the centenary by saluting the Guru as per Indian tradition

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात