मनोहर पर्रीकर यांच्या आठवणीने पंतप्रधान मोदी झाले भावुक


विशेष प्रतिनिधी

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या आठवणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. पंतप्रधानांनी ‘माझे मित्र’ म्हणत पर्रीकर यांचे स्मरण केले.
गोव्यातील पणजी हा मतदारसंघ मनोहर पर्रीकर यांचा गड होता. तिथून भाजपने उमेदवारी न दिल्याने त्यांचा पुत्र उत्पल पर्रीकर यांनी बंड केले आहेPrime Minister Modi became emotional with the memory of Manohar Parrikar

व ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यावरून विरोधी पक्षातील नेते भाजपवर निशाणा साधत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गोव्यातील पहिल्याच जाहीर सभेत पर्रिकर यांचे स्मरण केले. ते म्हणाले, मी जेव्हा जेव्हा गोव्यात येतो तेव्हा माझे मित्र मनोहर पर्रिकर यांची मला उणीव जाणवते. हीच भावना तुमचीही आहे.



तुम्हा गोवावासीयांना तर पर्रिकरांची उणीव अधिक जाणवत असेल. मी आज भाजपचे वरिष्ठ नेते दिवंगत फ्रान्सिस डिसुझा यांचेही स्मरण करतो. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली होती.मोदी म्हणाले, आज मला तुम्ही ज्या पदावर पहात आहात त्याची सुरुवात याच गोव्यातून झाली होती.

जून २०१३मध्ये येथे भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक झाली होती. त्या बैठकीला मी उपस्थित होतो. त्याच बैठकीत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार समिती प्रमुख म्हणून माझी निवड केली. त्यानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा केली गेली.

मी पंतप्रधानपदाचा उमेदवार बनल्यानंतर त्याचदिवशी मनोहर पर्रीकर यांनी पणजीत जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत मी सहजपणे बोलून गेलो. काँग्रेसमुक्त भारत हा शब्द माझ्या तोंडून निघाला आणि नंतर पुढे काय झाले ते तुम्ही पाहताच आहात. मी जो शब्द उच्चारला तो आज देशातील कोटी-कोटी जनतेचा संकल्प बनला आहे.

Prime Minister Modi became emotional with the memory of Manohar Parrikar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात