गुजरात मधील इंदिरा गांधी यांच्या नावे असलेली इमारत पाडून नरेंद्र मोदी प्रशिक्षण भवन बांधले जाणार


विशेष प्रतिनिधी

गांधीनगर : 1983 साली माधवसिंह सोळंकी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा गांधीनगर येथे इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन बांधण्यात आले होते. या इमारतीची पायाभरणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती. म्हणून या इमारतीचे नाव त्यांच्या नावावरून देण्यात आले होते.

Preparations are underway to demolish the building named after Indira Gandhi and construct a building in the name of Prime Minister Modi in gujarat

“ही बिल्डिंग जुनी झाल्यामुळे ती बिल्डिंग पाडून तेथे नवीन बिल्डिंग उभारण्यात यावी. त्या बिल्डिंगला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिले जावे. असा प्रस्ताव गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. परिषदेच्या बैठकीत ठराव मंजूर झाल्यानंतर ही फाईल मुख्यमंत्री पटेल यांना पाठवण्यात आली होती. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वालाही या प्रस्तावाबद्दल माहिती देण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांना या प्रस्तावाची माहिती दिल्यानंतर या प्रस्तावाबाबत एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटणार आहे.


EXCLUSIVE : Only Agenda-Modi Hate: कॉंग्रेसची गुंडगिरी-भाई जगतापांचा प्रताप! नरेंद्र मोदींवरील अभद्र मीमला उत्तर-अभिनेता रणवीर शौरींना धमकी ; शौरी म्हणाले हा फक्त मोदी-द्वेष


या सर्व प्रकरणानंतर कॉंग्रेस पक्षाकडून मात्र या गोष्टीसाठी विरोध होताना दिसून येतोय. भाजप सरकार राजकारण करत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. गुजरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी एक ट्विट करत म्हटले आहे, ‘भाजप सरकारने नवीन कोणतेही काम केलेले नाहीये. जे रेडिमेड आहे तेच विकायला सुरूवात केली आहे. आणि ज्या गोष्टी विकू शकत नाहीत त्यांची नावे बदलत आहेत. जसे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम आता नरेंद्र मोदी स्टेडियम आहे. आणि आता इंदिरा गांधी पंचायत राज संस्थेचे नाव देखील नरेंद्र मोदी असे ठेवले जाईल. राष्ट्रीय नेत्यांप्रती भाजपचे मन विषाने भरलेले आहे.’ असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

Preparations are underway to demolish the building named after Indira Gandhi and construct a building in the name of Prime Minister Modi in gujarat

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात