अफगाणिस्तानातले “आश्चर्य”; बायडेन प्रशासनाचे आणि तालिबानच्या मुल्ला बरादरचे…!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातल्या तालिबानच्या कब्जावर “आश्चर्य” व्यक्त झाले आहे. हे “आश्चर्य” दुसरे तिसरे कोणी नसून अमेरिकेतल्या बायडेन प्रशासन आणि तालिबानचा उपनेता मुल्ला बरादर या दोघांनी व्यक्त केली आहेत. दोघांची ठिकाणी वेगवेगळी आहेत पण “आश्चर्य” एक आहे… काय आहेत ही “आश्चर्य”? तर हे “आश्चर्य” आहे अफगानिस्तान एवढ्या लवकर तालिबानच्या कब्जात गेलेच कसे…?? Postmortem of “surprise” in Afghanistan by Chidanand Rajghata

अमेरिकेने आणि नाटो फौजांनी कोट्यावधी डॉलर्स खर्च करून अफगाणिस्तानातल्या तालिबान विरोधी सरकारला मदत केली. त्यांची फौज उभारून दिली. परंतु ती फौज तालिबानच्या सैन्यापुढे कशी काय लुळी पडली? त्या फौजेने तालिबानचा कसा काय प्रतिकार केला नाही? तालिबानची गेली राजवट आणि सध्याची राजवट या जवळजवळ दोन दशकभराचे अंतर आहे. या दोन दशकांच्या अंतरात अफगाणिस्तानने दोन अध्यक्षांच्या कारकिर्दी बघितल्या आहेत. हमीद करजाई आणि आशरफ घनी या दोन अध्यक्षांनी अफगाणिस्तानातली लोकशाहीवादी फौजेची मजबूत उभारणी कशी केली नाही? याविषयी बायडेन प्रशासनाला “आश्चर्य” वाटते, तर हेच “आश्चर्य” तालिबानचा उपनेता मुल्ला बरादर यालाही वाटते.

इतक्या लवकर संपूर्ण अफगानिस्तान कब्जात येईल आणि तो सुद्धा संघर्षाशिवाय असे आम्हाला वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया मुल्ला बदर याने दिली आहे. तालिबानच्या फौजा एकामागून एक शहरे काबीज करत होत्या. पण त्यांना कोणीही प्रतिकार केला नाही काबूलमध्येही आता प्रतिकार नावाची गोष्ट उरलेली नाही याचे आम्हाला खरंच “आश्चर्य” वाटते, असे मुल्ला बरादर म्हणाला.

अमेरिकेचे बायडेन प्रशासन आणि मुल्ला बदर या दोघांच्या “आश्चर्याचे” पोस्टमार्टेम टाइम्स ऑफ इंडियाचे वॉशिंग्टनमधील माजी प्रतिनिधी चिदानंद राजघाटा यांनी व्यवस्थित केले आहे. आपल्या फेसबुक पेजवरून त्यांनी अफगाणिस्तानातल्या घटनाक्रमावर भाष्य केले आहे.

– अफगाणिस्तानातल्या आजच्या परिस्थितीला बायडन प्रशासनाचे मुळमुळीत धोरण जबाबदार असल्याचे बोट दाखविले जाते. परंतु ही सुरुवात ट्रम्प प्रशासनाच्या काळात दोन वर्षांपूर्वीच झाली आहे. ज्या तालिबानला अमेरिकेने पूर्णपणे दहशतवादी घोषित केले होते, त्यांना ट्रम्प प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी राजनैतिक पाहुणे म्हणून चर्चेला बोलावले होते. त्यांच्याशी चर्चा केली होती.



ज्या तालिबानने राजनैतिक पाहुणा म्हणून ओसामा बिन लादेनचा पाहुणचार केला होता, त्या तालिबान्यांना ट्रम्प प्रशासनाने राजनैतिक पाहुण्यांचा दर्जा देऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. आजच्या अफगाणिस्तानातल्या पाडावाची ही चिदानंद राजघाट यांना सुरुवात वाटते.

रिपब्लिकन पार्टी आज बायडेन प्रशासनावर प्रशासनावर टीकेची झोड उठवत आहे. परंतु, आपल्याच पक्षाच्या अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या चुकीकडे ते दुर्लक्ष करतात. या सत्याकडे रिपब्लिकन पार्टी डोळेझाक करते आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानात कोट्यावधी डॉलर्स खर्च केले हे खरे. परंतु त्यांनी अफगाणिस्तानच्या सरकारला पूर्णपणे आपल्या सुरक्षा कवचावर अवलंबून ठेवले. स्वतंत्र फौजा उभ्या राहण्याच्या दृष्टीने प्रयत्नच केले नाहीत. त्यातून अफगाणिस्तानातल्या दोन अध्यक्षांच्या राजवटीत नुसत्या “कवायती फौजा” निर्माण झाल्या आणि त्यांच्याकडून तालिबान्यांचा मुकाबला करण्याची अपेक्षा ठेवली गेली. ही चूक असल्याचे चिदानंद राजघाटा यांनी अधोरेखित केले आहे.

आज प्रशासनातील परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन हे, इतक्या लवकर अफगाणिस्तान पडेल हे आम्ही अपेक्षित केले नव्हतेअसे म्हणत असले तरी पेंटॅगॉनचे रिपोर्ट तसे सांगत नाहीत. पेंटॅगॉनला अफगाणिस्तानातल्या परिस्थितीची संपूर्ण कल्पना होती. ती ट्रम्प आणि बायडेन या दोघांच्याही प्रशासकांना योग्य पद्धतीने देण्यात आली होती. कार्यवाही करणे दोन्ही प्रशासनाच्या हातात होते. याकडे पेंटॅगॉनच्या प्रतिनिधीने लक्ष वेधले आहे. यातच अफगाणिस्तानातल्या परिस्थितीची “खरी मेख” दडली आहे, असे चिदानंद राजघाटा यांनी स्पष्ट केले आहे.

Postmortem of “surprise” in Afghanistan by Chidanand Rajghata

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात