बाबासाहेबांचे आपल्याहून निघून जाणे हे शब्दांपलिकडचे दुःख; पंतप्रधानांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली


 प्रतिनिधी

नवी दिल्ली : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आपल्यातून निघून जाणे हे शब्दांच्या पलिकडले दुःख आहे, अशी भावपूर्ण श्रद्धांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केली आहे.PM Narendra Modi extends his condolences on the demise of Shivshahir Babasaheb Purandare.

बाबासाहेब पुरंदरे हे इतिहास जगले. त्यांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून काढता येणार नाही. परंतु त्यांचे ऐतिहासिक कार्य मात्र येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रचंड प्रेरणादायी आणि स्फुरण देणारे ठरेल. या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जोडलेल्या राहतील, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

बाबासाहेबांशी अनेक वर्ष संबंध आला. त्यांच्याशी सुसंवाद करता आला हे आपले भाग्य आहे. त्यांच्या शताब्दीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी मला मिळाली होती. माझ्या आयुष्यातला तो एक अविस्मरणीय क्षण होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनन्य पूजकाला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवो असेही पंतप्रधानांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

PM Narendra Modi extends his condolences on the demise of Shivshahir Babasaheb Purandare.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात