राज्यसभेतल्या भाषणातून मोदींची विरोधकांच्या ऐक्यामध्ये पाचर!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी एकजूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेससह सर्व विरोधकांच्या ऐक्य प्रयत्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतील भाषणातून पाचर मारून ठेवली. pm narendra modi axed opposition unity by his rajya sabha speech

केंद्रातले मोदी सरकार विरोधी पक्षांच्या राज्य सरकारांना त्रास देत असल्याचा आरोप काँग्रेससह बाकीचे विरोधी विशेषतः प्रादेशिक पक्ष करत असताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसनेच आपल्या राजवटीच्या काळात कोणकोणत्या पक्षांच्या राज्य सरकारांना त्रास दिला, त्यांची सरकारे कशी बरखास्त केली, याचा पाढाच वाचून दाखविला.

राज्य सरकारांवर केंद्र सरकार अन्याय करत असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने ६० वेळा घटनेच्या ३५६ कलमाचा गैरवापर करून अनेक विरोधकांची राज्य सरकारे बरखास्त केल्याची आठवण मोदींनी करवून दिली. त्यांच्या या तडाख्यातून कोणीही सुटले नाही. द्रमूक, अण्णा द्रमूक, कम्युनिस्ट, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगु देशम या सर्व पक्षांना मोदींनी आज ठोकून काढले.



पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आम्हाला काँग्रेसवाले फेडरल सरकारांची शिकवणी देत आहेत. पण त्यांचीच केंद्रात सरकारे असताना पंतप्रधान नेहरू आणि इंदिरा गांधींनी ३५६ कलमाचा गैवापर करून कम्युनिस्टांचे सरकार पाडले होते. तामिळनाडूत करूणानिधी, एम. जी. रामचंद्रन, आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव महाराष्ट्रात शरद पवार या मोठ्या नेत्यांची सरकारे काँग्रेसच्या केंद्र सरकारांनी बरखास्त केली होती. आज त्यापैकी द्रमूक, कम्युनिस्ट आणि शरद पवार त्याच काँग्रेसच्या बाजूला बसले आहेत. सगळ्यांन एकाच व्यक्तीविरूद्ध म्हणजे मोदींविरूद्ध जमावडा केला आहे. पण त्यांना मला हरविणे जमणार नाही. कारण जनतेचा मला आशीर्वाद आहे, असा जबरदस्त प्रहार पंतप्रधान मोदींनी केला. त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांची एकजूट उधळून लावली.

ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, के. चंद्रशेखर राव, शरद पवार, उद्धव ठाकरे, फारूक अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, नितीश कुमार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आदी नेते विरोधकांच्या ऐक्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या बैठका कधी होतात, तर कधी बिघडतात.

या राजकीय पार्श्वभूमीवर मोदींचे राज्यसभेतले आजचे भाषण महत्त्वाचे ठरले. वर उल्लेख केलेले सगळे मोठे नेते आज मोदीविरोधात काँग्रेसच्या बाजूने आहेत. पण ते सगळे काँग्रेसचे व्हिक्टिम आहेत, हे मोदींनी ठळक उल्लेखांनी दाखवून दिले आणि विरोधकांच्या ऐक्यात पाचर मारून ठेवली.

pm narendra modi axed opposition unity by his rajya sabha speech

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात