देशात पेट्रोल, डिझेलच्या वापरामध्ये प्रचंड वाढ, अर्थचक्र सुरळित होण्याचे संकेत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या इंधन कंपन्यांनी जुलैमध्ये २.३७ दशलक्ष टन पेट्रोलची विक्री केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १७ टक्क्यांनी जास्त आहे. जुलै २०१९ मध्ये हेच प्रमाण २.३९ दशलक्ष टन एवढे होते. जुलैमध्ये पेट्रोलच्या मागणीत मोठी वाढ झाली असून पेट्रोलचा वापर आता जवळपास कोविडपूर्व स्तरापर्यंत पोहोचला आहे. Petrol use increased in whole country

नागरिक मोठ्या संख्येने खासगी वाहने वापरत आहेत. त्यामुळे पेट्रोलची मागणी वाढली आहे. तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे पुन्हा निर्बंध लावण्यात आले नाहीत, तर डिझेलच्या वापरातही लवकरच कोविडपूर्व काळाएवढी वाढ होईल.



देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या विक्रीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.३६ टक्क्यांनी वाढ झाली. यंदा जुलैमध्ये ५.४५ मिलियन टन डिझेलची देशभरात विक्री झाली; मात्र जुलै २०१९ च्या तुलनेत हे प्रमाण अजूनही १०.९ टक्क्यांनी कमी आहे. मे महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांत कठोर निर्बंध लादण्यात आले होते. जूनपासून त्यामध्ये शिथिलता येत असल्याने व्यवहार पुन्हा पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे पेट्रोलची मागणी वाढत आहे; मात्र औद्योगिक व्यवहार अजूनही पूर्णपणे पूर्वपदावर न आल्याने डिझेलचा वापरात अपेक्षित वाढ झालेली नाही.

Petrol use increased in whole country

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात