पाकिस्तान व्याप्त काश्मीरही लवकरच भारताचा भाग होईल; एअर मार्शल अमित देव यांचा आत्मविश्वास


वृत्तसंस्था

श्रीनगर : आजच्या पायदळ दिनाच्या दिवशी हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख एअर मार्शल अमित देव यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण व्यूहरचनात्मक वक्तव्य केले आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीर लवकरच भारताचा भाग होईल, असे विधान त्यांनी केले आहे.Pakistan-occupied Kashmir will soon become part of India; Confidence of Air Marshal Amit Dev

27 ऑक्टोबर 1947 रोजी भारताच्या सरकारने रॉयल इंडियन एअर फोर्सच्या डाकोटा विमानांमधून भारतीय सैन्य दल श्रीनगरच्या विमानतळावर उतरवल होते. तेथूनच पाकिस्तानला उखडण्याची सुरुवात झाली होती. त्यामुळे 27 ऑक्टोबरला भारतीय सैन्य दल पायदळ दिन म्हणून साजरा करते.



यानिमित्ताने झालेल्या समारंभात बोलताना एअर मार्शल अमित देव म्हणाले, की काश्मीरच्या मुक्ततेमध्ये हवाई दलाचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे. आपल्या शूर जवानांनी पाकिस्तानला जम्मू-काश्मीर मधून हाकलून दिले आणि काश्मीर मुक्त करण्याचा आजच्याच दिवशी यशस्वी संकल्प केला होता. पूँचसारख्या अतिदुर्गम भागात तेथील जनतेने भारतीय हवाई दलासाठी कोणतेही साधनसामग्री नसताना केवळ सात दिवसांमध्ये हवाई पट्टीची उभारणी केली होती.

त्यामुळे त्या परिसरात भारतीय सैन्यदल उतरून पाकिस्तानी सैन्याला पराभूत करता आले. त्यावेळी भारतीय सैन्याने आपल्या धैर्य आणि शौर्याने काश्मीरला भारताचे अभिन्न अंग बनविले. महाराजा हरिसिंग यांनी सामीलनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. परंतु पाकिस्तानी आक्रमकांनी काश्मीरवर बेकायदेशीर रित्या कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप केला नसता तर भारतीय सैन्य दलाने आपल्या युद्ध कौशल्याने आणि क्षमतेने त्याच वेळी संपूर्ण काश्मीर मुक्त करून दाखविले असते. परंतु त्यावेळी ते घडले नसले तरी येत्या काळात लवकरच पाकिस्तान व्याप्त काश्मीर सुद्धा भारताचा अभिन्न भाग असेल, असा आत्मविश्वास एअर मार्शल अमित देव यांनी व्यक्त केला आहे.

अमित देव यांच्यासारख्या अत्यंत वरिष्ठ अधिकार्याने हे व्यूहरचनात्मक विधान केल्याने भारतीय सैनिकांचा आत्मविश्वास किती उंचावलेला आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. केंद्रातल्या सरकारचे धोरण संरक्षण आणि परराष्ट्र धोरण आक्रमक आहे. कोणत्याही स्थितीत आपली एक इंचही भूमी गमवायची नाही.

उलट आधी जी भूमी गमावली गेली असेल ती पुन्हा मिळवायची, असा भारतीय सैन्य दला बरोबरच केंद्र सरकारचाही स्पष्ट इरादा आहे.या पार्श्‍वभूमीवर एअर मार्शल अमित देव यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीर लवकरच भारताचा भाग होईल, हे केलेले वक्तव्य संपूर्ण भारताचा आत्मविश्वास प्रतिबिंबित करताना दिसते आहे.

Pakistan-occupied Kashmir will soon become part of India; Confidence of Air Marshal Amit Dev

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात