तालिबानला सहकार्य करीत नसल्याचा पाकिस्तानचा बहाणा, पंजशीरमध्य सहकार्याचे आरोप फेटाळले


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : अफगाणिस्तानमधील पंजशीर खोऱ्यावर तालिबानने केलेल्या आक्रमणावेळी त्यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी मदत केल्याचा आरोप चुकीचा असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. Pakistan denies role in Afghanistan

आमच्याविरोधात हा अपप्रचार सुरु असल्याचा दावाही त्यांनी केला. तालिबानने ६ सप्टेंबरला पंजशीर खोऱ्याचा ताबा मिळविला. यासाठी तालिबानला पाकिस्तानच्या २७ हेलिकॉप्टर आणि विशेष सैन्य दलाच्या सैनिकांनी मदत केल्याचा तालिबानविरोधी गटाचा आरोप आहे. पाकिस्तानने मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे.



दरम्यान जर्मनीतील डॉईश वेल या वाहिनीच्या अफगाणिस्तानमधील १० प्रतिनिधींची काबूलमधून सुटका झाली असून ते पाकिस्तानात दाखल झाले आहेत. तालिबान्यांनी काबूल विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर या सर्वांना विमानाने बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले होते. हे प्रतिनिधी पाकिस्तानात कोणत्या मार्गाने पोहोचले, याबाबत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रतिनिधींच्या सुटकेसाठी जर्मनी आणि कतारच्या सरकारने मदत केली. पाकिस्ताननेही मानवतावादी दृष्टीकोनातून त्यांना प्रवेश दिला.

Pakistan denies role in Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात