पी. टी. उषा, इलैराजा यांच्यासह चौघांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती


प्रतिनिधी

मुंबई : राज्यसभेच्या 57 जागांसाठी नुकत्याच महाराष्ट्रासह विविध राज्यांत निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त 12 सदस्यांपैकी 4 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे चारही सदस्य दक्षिण भारतातील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. P. T. Four of them, including Usha and Ilairaja, have been appointed as Rajya Sabha-appointed MPs



या चार सदस्यांचा समावेश

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा झेंडा अभिमानाने उंचावणा-या धावपटू पी. टी. उषा, ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक इलैराजा, समाजसेवक वीरेंद्र हेगडे आणि सृजनशील क्षेत्रातील व्ही. विजयेंद्र प्रसाद गुरू यांची नियुक्ती राष्ट्रपती नियुक्त सदस्यांमध्ये करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

 

भारतीय संविधानातील तरतुदीनुसार भारताच्या राष्ट्रपतींकडून कला, साहित्य, समाजसेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या 12 सदस्यांची निवड संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत करण्यात येते.

P. T. Four of them, including Usha and Ilairaja, have been appointed as Rajya Sabha-appointed MPs

महत्वाच्या बातम्या 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात