उद्योगपती १०० कोटीपैकी ९५ कोटी भाजपाला देतात आणि उरलेले पाच कोटी इतरांना, अशोक गेहलोत यांची मळमळ उघड

निवडणूक निधीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी सरकारने निवडणूक रोख्यांचा मार्ग सुरू केला आहे. मात्र,त्याला विरोधी पक्षाकडून विरोध होत आहे. या विरोधामागचे कारण आता उघड झाले आहे.

उद्योगपतीने १०० कोटी रुपये निवडणूक निधीसाठी दिले तर त्यातील ९५ कोटी भारतीय जनता पक्षाला आणि उरलेले ५ कोटी रुपये इतर सगळ्या पक्षांना मिळून देतात अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपली मळमळ उघड केली आहे.Out of Rs 100 crore, industrialists give Rs 95 crore to BJP and the remaining Rs 5 crore to others, Ashok Gehlot


विशेष प्रतिनिधी

जयपूर : निवडणूक निधीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी सरकारने निवडणूक रोख्यांचा मार्ग सुरू केला आहे. मात्र,त्याला विरोधी पक्षाकडून विरोध होत आहे. या विरोधामागचे कारण आता उघड झाले आहे.

उद्योगपतीने १०० कोटी रुपये निवडणूक निधीसाठी दिले तर त्यातील ९५ कोटी भारतीय जनता पक्षाला आणि उरलेले ५ कोटी रुपये इतर सगळ्या पक्षांना मिळून देतात अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपली मळमळ उघड केली आहे.जयपूरमध्ये होणाºया तीन पोटनिवडणुकांसाठी कॉँग्रेसच्या उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत. यावेळी गेहलोत बोलत होते.राजस्थानातील पोटनिवडणुकीसाठी प्रचारसभेत बोलताा गेहलोत म्हणाले, त्यांनी नोटाबंदी केली. उद्योगपतींना धमकावले.

आता त्यांनी निवडणूक रोखे काढले आहेत. आम्हाला वाटत होते की सर्वोच्च न्यायालय तरी त्याच्यावर बंदी घालेल. परंतु, हे झाले नाही. त्यामुळेचआता उद्योगपती निवडणूक रोख्यातून १०० कोटी रुपये देणार असतील तर भाजपाला ९५ कोटी रुपये देतात.

उर्वरित पाच कोटी रुपये कॉँग्रेस, कम्युनिस्ट, बहुजन समाज पक्ष यासारख्या पक्षांना देतात. जर समान संधी मिळणार नसेल तर लोकशाही बळकट कशी होईल?

गेहलोत म्हणाले, भारतीय जनता पक्ष शेतकºयांच्या आशिर्वादाने सत्तेवर आला. संसदेत मोठे बहुमत मिळविले. मात्र आता भाजपा शेतकºयांचे एकायला तयार नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही.

Out of Rs 100 crore, industrialists give Rs 95 crore to BJP and the remaining Rs 5 crore to others, Ashok Gehlot

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*