Mamtas appeasement Politics; ममतांच्या तुष्टीकरण राजकारणाची विषारी परिणिती!!; तृणमूळचा नेता शेख आलम म्हणतोय, आम्ही आणखी ४ पाकिस्तान बनवू!!

वृत्तसंस्था

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसच्या गुंडांनी हिंसाचाराचे टोक गाठलेच आहे… पण आता तृणमूळ काँग्रेसचे स्थानिक नेते पाकिस्तानची विषारी भाषाही बोलू लागले आहेत. if our Muslim population moves to one side then we can create 4 new Pakistans

तृणमूळ काँग्रेसचा नेता शेख आलम याने तृणमूळ काँग्रेसच्या सभेत जाहीररित्या १ नव्हे, तर ४ नवी पाकिस्तान बनविण्याची धमकी दिली आहे. प्रचार सभेत बोलताना तो म्हणाला, की आम्ही पश्चिम बंगालमध्ये सध्या ३० टक्के आहोत. ते (हिंदू) ७० टक्के आहेत.ते भाजपचे लोक त्या ७० टक्के (हिंदू) लोकसंख्येच्या बळावर सत्तेवर येऊ पाहताहेत. पण आम्ही ३० टक्के मुसलमान जर दुसऱ्या बाजूला (बांगलादेशाच्या बाजूला) वळलो, तर आमची म्हणजे मुसलमानांची लोकसंख्या वाढेल. आम्ही एकच नाही, तर चार पाकिस्तान बनवू शकू. मग ते ७० टक्के (हिंदू) लोक कुठे जातील…!! त्यांना हिंदुत्वाचा प्रचार करताना लाज वाटली पाहिजे, असे विषारी उद्गार शेख आलमने काढले.

ममतांवर दिलीप घोष यांचे टीकास्त्र

ममता बॅनर्जी जय श्रीरामच्या घोषणेला विरोध करतात. दुर्गा पूजा, सरस्वती पूजा यांच्यावर बंगालमध्ये बंदी घालतात. दुर्गा विसर्जनावर बंदी घालतात. पण त्या हिजाब घालतात. अजान देतात. आणि निवडणूकीत आपण कायस्थ असल्याचे सांगून दुर्गा सप्तशती पाठ ऐकवतात. पण बंगालची हिंदू जनता ममतांचे मुसलमानांच्या लांगूलचालनाचे राजकारण चांगले जाणून आहे, अशी टीका भाजपचे नेते दिलीप घोष यांनी केली.

 

IF our Muslim population moves to one side then we can create 4 new Pakistans

 

वाचा आणखी…..

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*