राष्ट्रीय महामार्गांच्या खासगीकरणातून केंद्र सरकार उभारणार एक लाख कोटी

यंदाच्या अर्थसंकल्पात निर्गुंतवणूक धोरणातून निधी उभा करून जनहिताची कामे करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्गांचे खासगीकरण करण्याची योजना तयार करत असल्याचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. उद्योजकांनी पुढे येऊन या योजनेत गुंतवणूक करून फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.One lakh crore will be raised by the central government through privatization of national highways


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : यंदाच्या अर्थसंकल्पात निर्गुंतवणूक धोरणातून निधी उभा करून जनहिताची कामे करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारराष्ट्रीय महामार्गांचे खासगीकरण करण्याची योजना तयार करत असल्याचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. उद्योजकांनी पुढे येऊन या योजनेत गुंतवणूक करून फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

उद्योजकांची संघटना असलेल्या सीआयआयच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आगामी पाच वर्षांत महामार्गांचे खासगीकरण करून एक लाख कोटी रुपये उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे. बाजारात मालमत्ता विक्री किंवा लीज ही उद्योगांसाठी चांगली व्यवसाय संधी आहे. 

राष्ट्रीय महामार्गांच्या खासगीकरणामुळे प्रगतीचा वेग वाढणार आहे. यातून मिळालेला निधी मजबूत पायाभूत सुविधांच्या विकासांसाठी वापरला जाऊ शकतो. आगामी पाच वर्षांत टोल वसुली आणि राष्ट्रीय महामार्गांच्या हस्तांतरणाद्वारे बाजारपेठेतून एक लाख कोटी रुपये उभे करण्याची योजना आखत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना बाजारपेठेत खासगीकरण करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे. राष्ट्रीय संपत्ती बाजारात आणण्याची योजना हा एक महत्त्वाचा उपक्रम होता. पायाभूत क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक चांगली संधी आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन अंतर्गत १११ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवले असून, हरित दृष्टीकोन स्वीकारत पर्यावरणाला हानी न पोहोचवता विकास करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. २२ ग्रीन हायवे कॉरिडोरपैकी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन महानगरांदरम्यान वाहनाने प्रवास करण्याचा वेळ कमी केला जाईल. हा प्रवास १२ तासांत होऊ शकेल. आताच्या घडीला या प्रवासाला ४० तास लागतात, असेही गडकरी म्हणाले.

One lakh crore will be raised by the central government through privatization of national highways

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*