NV Ramana will be the next Chief Justice of the country, CJI Bobde recommended to the government

एनव्ही रमणा होणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश, CJI शरद बोबडेंनी केली सरकारला शिफारस

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा (NV Ramana) हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी त्यांच्या नावाची शिफारस सरकारकडे पाठविली आहे. अलीकडेच सरकारने त्यांना उत्तराधिकारी म्हणून नाव पाठविण्यास सांगितले होते. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे 23 एप्रिल रोजी आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत. यानंतर एनव्ही रमणा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करताना दिसतील. विद्यमान सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्यानंतर एनव्ही रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा (NV Ramana) हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी त्यांच्या नावाची शिफारस सरकारकडे पाठविली आहे. अलीकडेच सरकारने त्यांना उत्तराधिकारी म्हणून नाव पाठविण्यास सांगितले होते. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे 23 एप्रिल रोजी आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत. यानंतर एनव्ही रमणा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करताना दिसतील. विद्यमान सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्यानंतर एनव्ही रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल.

आंध्र प्रदेशातील रहिवासी असलेले एन. व्ही. रमणा यांची 2000 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. फेब्रुवारी 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक होण्यापूर्वी ते दिल्ली उच्च न्यायालयात होते. 63 वर्षीय नुथालपाती वेंकट रमणा यांनी 10 फेब्रुवारी 1983 पासून त्यांच्या न्यायालयीन कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी आंध्र प्रदेशातून वकील म्हणून सुरुवात केली होती.

45 वर्षांपेक्षा जास्त अनुभव

वकिलीनंतर त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, आंध्र प्रदेश प्रशासकीय न्यायाधीकरण आणि सर्वोच्च न्यायालयातही प्रॅक्टीस केली. ते घटनात्मक, गुन्हेगारी आणि आंतरराज्यीय नदी जल वाटपाच्या कायद्याचे तज्ज्ञ मानले जातात. जवळपास 45 वर्षांचा असा दीर्घ अनुभव असलेले एनव्ही रमणा हे सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक महत्त्वपूर्ण निकालांच्या घटनात्मक खंडपीठात सहभागी राहिलेले आहेत.

NV Ramana will be the next Chief Justice of the country, CJI Bobde recommended to the government

महत्त्वाच्या बातम्या

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*