नुसरत जहॉँने मतदारांची फसवणूक करत संसदेची प्रतिष्ठा कलंकित केली, लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची भाजपा खासदारांची मागणी


पश्चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदार संघातील तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) खासदार नुसरत जहाँ यांनी आपल्या मतदाराची फसवणूक केली असून संसदेची प्रतिष्ठाही कंलकित केली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे केली आहे. लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून नुसरत जहॉँ यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.Nusrat Jahan defames Parliament by cheating voters, BJP MPs demand cancellation of Lok Sabha membership


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदार संघातील तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) खासदार नुसरत जहाँ यांनी आपल्या मतदाराची फसवणूक केली असून संसदेची प्रतिष्ठाही कंलकित केली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे केली आहे.

लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून नुसरत जहॉँ यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.उत्तर प्रदेशच्या बदायूं लोकसभा मतदारसंघाच्या खासदार संघमित्रा मौर्य यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘नुसरत जहां यांनी लोकसभेच्या सदस्यपदाची शपथ घेताना नुसरत जहाँ रुही जैन असे आपले नाव लिहिले होते.



लोकसभेच्या अधिकृत संकेतस्थळावरही तिच्या पतीचे नाव निखिल जैन आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती. नुसरत जहाँ यांच्या वैयक्तिक आयुष्यात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. परंतु, त्यांनी संसदेला दिलेली माहिती चुकीची असून त्यांनी आपल्या मतदारांची फसवणूक केली आहे.

निखिल आणि नुसरत यांचे लग्न तुर्की मॅरेज रेग्युलेशनच्या आधारे 19 जून 2019 रोजी तुर्कीमध्ये झाले. त्यामुळे नुसरत यांनी निखिलपासून घटस्फोटासाठी अर्ज करण्यास नकार दिला होता. कारण त्यांचे म्हणणे होते की, हा लग्नाचा कायदा तुर्की देशातील असून तो भारतात लागू होत नाही. त्यामुळे मी निखिलसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

नुसरत जहाँ यांनी निखिलवर आपल्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप केले होते. निखिलने विभक्त झाल्यावरदेखील माझ्या खात्यातून चुकीच्या पद्धतीने पैसे काढले. मी हे प्रकरण बॅक अधिकाऱ्यांसमोर ठेवले असून लवकरच याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे नुसरत यांनी सांगितले.

दरम्यान, नुसरत जहाँ यांनी केलेले आरोप पती निखिल जैन यांनी फेटाळून लावले असून हे आरोप निराधार असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, नुसरतसाठी मी बरेच काही केले असून तिने नेहमीच लग्न नोंदणी करण्यास नकार दिला होता. माझ्यावर करण्यात येणारे आरोप खोटे आहेत.

Nusrat Jahan defames Parliament by cheating voters, BJP MPs demand cancellation of Lok Sabha membership

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात