परराष्ट्रधोरण स्वतंत्र असल्याने कोणत्याही महासत्तेची भारताविरुध्द बोलण्याची नाही हिंमत, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून कौतुक


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : भारत हा स्वाभिमानी देश आहे. भारताचे परराष्ट्र धोरण हे स्वतंत्र आहे. कोणत्याही महासत्तेची भारताविरोधात बोलण्याची हिंमत नाही. भारत रशियाकडून इंधन विकत घेत आहे, परंतु त्यांना कोणी काही बोलू शकत नाही, अशा शब्दांत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे कौतुक केले आहे.No superpower dares to speak against India as foreign policy is independent, praises Pakistan’s PM Imran Khan

अविश्वास प्रस्तावाच्या काही तास आधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले, २६ वर्षांपूर्वी मी माझा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मी निराश झालो आहे, पण मी निर्णयाचा आदर करतो. मी एकदाच तुरुंगात गेलो आहे, जोपर्यंत देशाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी न्यायाची चर्चा करेन. या ठिकाणी खुलेआम घोडेबाजार सुरू आहे. शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे त्यांना हॉटेलमध्ये बंद केले जात आहे. कोणत्या ठिकाणी याची परवानगी मिळते. पाकिस्तानच्या लोकशाहीची उघडपणे चेष्टा बनली आहे.



इम्रान खान म्हणाले, देशाची ६० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ३० वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. अशा राष्ट्राच्या तरुणांना आम्ही वाचवणार नाही आणि तुमच्याकडे नेते लाच घेऊन सरकार पाडतायत हे दाखवतोय. आपण त्यांना काय दाखवत आहोत? पाकिस्तानचे लोकप्रतिनिधी आपला स्वाभिमान विकत आहेत आणि आरक्षित जागाही उघडपणे विकल्या जात आहे.

मी पाकिस्तान म्हणून बोलत आहे. या देशाला मोठा देश बनवण्याचं स्वप्न मी पाहत होतो. हे जे सुरू आहे ते स्ट्रगल आहे. जे सुरू आहे त्यानं या स्वप्नाला धक्का लागत आहे. आम्ही सायफर प्रकाशित केल्यास आमची गुप्त माहिती जगाला कळेल.आपल्या अविश्वास ठरावामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप करत इम्रान खान म्हणाले,

अमेरिकेत पाकिस्तानी राजदुताने अमेरिकेच्या एका अधिकाºयाची भेट घेतली. त्यांना इम्रान खान यांनी रशियाला जायला नव्हतं पाहिजे. इम्रान खान अविश्वास प्रस्तावापासून वाचले तर पाकिस्तानला समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु ते जर हरले तर पाकिस्तानला माफ केलं जाईल असे आश्वान त्यांनी दिले आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी आपल्या देशातील लोकांना भेटत आहेत.

आमच्या लोकांनी मला सांगितलं की अमेरिकेनं आम्हाला बोलावलं आणि अविश्वास प्रस्ताव येणार असल्याचं सांगितलं. ही पूर्ण स्क्रिप्ट सुरू होती. त्यांना माहीत आहे की इम्रान खान यांचे ना कोणते बँक खाते आहे ना बाहेर कोणती मालमत्ता आहे. हे सर्व नाटक मला हटवण्यासाठी आहे. विरोधी पक्ष देशासाठी प्रत्येक त्याग करण्यास तयार आहे. अमेरिका नाराज होऊ नये असे विरोधकांना वाटत होते म्हणून ते हे करत आहेत, रशियाप्रमाणे आपली मालमत्ता जप्त होऊ नये, अशी भीती वाटत आहे.

No superpower dares to speak against India as foreign policy is independent, praises Pakistan’s PM Imran Khan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात