निकीता तोमर लव्ह जिहाद हत्या प्रकरणात तौसिफ, रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा; हरियाणा सरकार फाशीच्या शिक्षेसाठी हायकोर्टात करणार अपील

वृत्तसंस्था

चंडीगड :  फरीदाबादच्या निकिता तोमर लव्ह जिहाद हत्या प्रकऱणातील मुख्य आरोपी तौसिफ आणि त्याचा सहकारी रेहान यांना फरीदाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवून आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. परंतु, हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी मात्र, ताबडतोब या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.Nikita Tomar love jihad murder case: Faridabad Court sentences convicts Tausif and Rehan to life imprisonment.

हरियाणा सरकार या निकालाचा कायदेशीर अभ्यास करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी हायकोर्टात अपील करेल, असे विज यांनी सांगितले. तौसिफ आणि रेहान यांचा गुन्हा अतिशय गंभीर आहे. त्यांना फाशीची शिक्षा योग्य असल्याचे मत गृहमंत्री विज यांनी व्यक्त केले.तत्पूर्वी, फरीदाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तौसिफ आणि रेहान यांना बुधवारीच दोषी ठरविले होते. त्याचवेळी शुक्रवारी त्यांच्या शिक्षेसंदर्भातील युक्तीवादानंतर शिक्षा सुनावण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. त्यानुसार कोर्टाने चार महिन्यांत या केसचा निकाल दिला आहे.

निकीताच्या कुटुंबीयांनी दोन्ही आरोपींचा गंभीर गुन्हा पाहून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी कोर्टात केली होती. परंतु, कोर्टाने तौसिफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

लव्ह जिहादमधून निकीताची हत्या

हरियाणाच्या फरीदाबादमधील २१ वर्षीय निकिता तोमरची तौसिफने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली होती. १ डिसेंबरपासून या प्रकरणी खटल्याची सुनावणी सुरू होती. यानंतर चार महिन्यांनी फरिदाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाना आरोपींना दोषी ठरविले होते.

निकीतावर आपले प्रेम होते. पण ती दुसऱ्याशी लग्न करणार असल्याने हत्या केल्याचे तौसिफने पोलिसांना सांगितले होते. निकिताच्या कुटुंबाने २०१८ मध्ये दाखल केलेल्या केसमुळे आपले करिअर उद्ध्वस्त झाल्याचा दावाही तौसिफने केला होता. अटक झाल्याने मी मेडिसिनचा अभ्यास करू शकलो नाही. यामुळे मी बदला घेतला, असे तौसिफने पोलिसांना तपासात सांगितले होते.

हत्येनंतर एसआयटीने तपास हाती घेतला होता. तौसिफ निकीताला लग्नासाठी जबरदस्ती करत होता. यात त्याला त्याच्या कुटुंबाचाही पाठिंबा होता. असा आरोप निकीताच्या कुटुंबाने केल्याने पोलिसांनी लव्ह जिहादच्या अँगलने या प्रकरणाचा तपास केला होता.

पोलिसांनी कोर्टात ५५ साक्षीदार न्यायालयात पेश केले. सीसीटीव्ही फुटेजबरोबर फॉरेन्सिक रिपोर्ट, तौसिफ ज्या कारमधून आला होता, त्या कारमध्ये त्याचे केस आढळले. रेहानचे फिंगरप्रिंट कारमध्ये आढळले.

तौसिफ आणि रेहान यांनी निकीताच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा निकिताने त्याला ठामपणे विरोध केला तेव्हा तौसिफने पिस्तुल काढून तिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पकडला गेला होता. अपहरणाचा प्रयत्न फसल्यानंतर तौसिफने हत्या केली. त्यावेळी रेहान त्याच्या सोबत होता.

Nikita Tomar love jihad murder case: Faridabad Court sentences convicts Tausif and Rehan to life imprisonment.

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*