खासदार सिमरनजीत सिंग मान यांचे पुन्हा गरळ; भगतसिंगांचा दहशतवादी म्हणून अपमान; खलिस्तानचेही समर्थन!!


वृत्तसंस्था

अमृतसर : शिरोमणी अकाली दल (अमृतसर) चे खासदार सिमरन जीत सिंग माने यांनी पुन्हा एकदा गरळ ओकले आहे. प्रख्यात क्रांतिकारक शहीद भगतसिंगांचा उल्लेख त्यांनी दहशतवादी म्हणून केला असून त्यांनी खलिस्तानचे देखील समर्थन केले आहे. Newly elected MP Simranjit Singh Mann who calls Bhindranwale a freedom fighter says Bhagat Singh was a terrorist

अर्थात भगतसिंगांना दहशतवादी म्हणणे आणि खलिस्तानचे समर्थन करणे हे सिमरनजीत सिंग मान यांच्यासाठी नवीन नाही. 1984 पासून त्यांनी खलिस्तानचे समर्थन केलेच आहे, तर 2005 पासून ते भगतसिंगांना दहशतवादी असेच संबोधत आहेत. भगतसिंगांनी आपल्या क्रांतिकार्यादरम्यान लाहोरमध्ये ब्रिटिश सार्जंटची हत्या केली. त्यावेळच्या ब्रिटिशांच्या अंकित असणाऱ्या पार्लमेंटमध्ये बॉम्ब फेकला. हे क्रांतिकारी कृत्य नव्हते तर दहशतवादी कृत्य होते, असे गरळ सिमरजीत सिंग मान यांनी पुन्हा ओकले आहे.

त्याचबरोबर खलिस्तानचे समर्थन करताना त्यांनी अजब तर्कट लढवले आहे. इस्लामिक पाकिस्तानकडे, हिंदू भारताकडे आणि कम्युनिस्ट चीनकडे अणुबॉम्ब आहेत. परंतु खलिस्तानची निर्मिती करून जर स्वतंत्र राष्ट्र तयार केले तर ते तीनही देशांसाठी “बफर स्टेट” ठरेल आणि भारत – पाकिस्तान – चीन यांच्यात कधीच अणुयुद्ध होणार नाही, असा दावा सिमरनजीत सिंग मान यांनी केला आहे.

चंदीगड विमानतळाचे नामांक नामकरण शहीद भगतसिंग यांच्या नावाने करण्याच्या वेळी २००५ मध्ये देखील सिमरनजीत सिंग मान यांनी त्याला विरोध केला होता. त्यावेळी देखील भगतसिंग हे दहशतवादी असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यावेळी सरकारने त्यांच्याविरुद्ध खटलाही दाखल केला होता. परंतु त्यावेळचा अभियोक्ता पक्ष म्हणजे सरकार सिमरनजीत सिंग मान यांचे वक्तव्य देशविरोधी आणि क्रांतिकारकांचा अपमान करणारे असल्याचे सिद्ध करू शकले नव्हते.

आता पुन्हा एकदा त्यांनी भगतसिंग यांच्याविरुद्ध गरळ ओकले आहे आणि खलिस्तानचे देखील समर्थन केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि पंजाब सरकार कोणती कायदेशीर कारवाई करते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पंजाबचे सध्याचे मुख्यमंत्री भगवंत माने यांनी तर भगतसिंग यांच्या हौतात्म्याच्या गावी म्हणजे हुसैनीवाला येथे जाऊन शपथ घेतलेली होती. आता पंजाब सरकार त्यांच्यावर काय कारवाई करते यालाही महत्त्व आहे.

Newly elected MP Simranjit Singh Mann who calls Bhindranwale a freedom fighter says Bhagat Singh was a terrorist

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात