राज्यसभा निवडणूक : उद्धव ठाकरेंच्या पराभवाच्या जखमेवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची मलमपट्टी!!


प्रतिनिधी

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरा उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड दुखावले आहेत. राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपापल्या मतांचा कोटा वाढवून आपापल्या उमेदवारांच्या जागा सेफ करून घेतल्या. याचा फटका संजय पवारांना बसल्याचे मतांच्या अंकगणितातून दिसून येत आहे. NCP leaders bandage the wounds of Uddhav Thackeray’s defeat !!

या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पराभवाच्या जखमेवर मलमपट्टी करायला सुरुवात केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची यासंदर्भात वक्तव्ये आली आहेत. उद्धव ठाकरे यांची नाराजी स्वाभाविक आहे.



आमच्याकडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 3 पक्षांची मिळून 153 मध्ये होती. 10 अपक्षांचा आम्हाला पाठिंबा असल्याने ती मत 163 वर गेली. असे असताना देखील 4 – 5 मते इकडेतिकडे गेल्याने पराभव पत्करावा लागला. हा चिंतेचा विषय आहे. उद्धव ठाकरे यांची नाराजी स्वाभाविक आहे, अशा शब्दांमध्ये जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या पराभवाच्या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला आहे.

– शरद पवारांनी बोलावली बैठक

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवावर चर्चेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे. मतदानाच्या वेळेला नेमके काय घडले? आणि कसे घडले?, या विषयी त्यामध्ये चर्चा होईल आणि विधान परिषद निवडणुकीसाठी कशी काळजी घ्यायची याच्यावर विचारविनिमय होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आप आपल्या मतांचा कोटा वाढवून मतदान केले. त्याचा राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला फटका बसला आहे. आता विधानपरिषद निवडणुकीसाठी रणनीती ठरविण्याच्या दृष्टीने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. या बैठकीत नेमके काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

NCP leaders bandage the wounds of Uddhav Thackeray’s defeat !!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात