रहिवाशांच्या विरोधामुळे नौदलाने रद्द केले येथील झेंडावंदन, भारतविरोधी कारवाया सहन करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा


विशेष प्रतिनिधी

पणजी : स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने दक्षिण गोव्यातील साओ जॅसिंटो बेटावर राष्ट्रध्वज फडक ाविण्याचा सोहळा नौदलाने रद्द केला आहे. यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त करत अशा भारतविरोधी कारवाया सहन करणार नाही असा इशारा दिला आहे.Navy cancels flag hoisting due to protests by residents, CM warns against anti-India activities

केंद्र किंवा राज्य सरकारने या बेटावर कोणतेही उपक्रम राबवायचे नाहीत, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली होती. त्यामुळे नौदलाने झेंडावंदनाचा कार्यक्रम रद्द केला आहे. मात्र, भारविरोधी कारवायांच्या या प्रयत्नांना हाणून पाडले जाईल. भारतीय नौदलाने आपल्या योजनेनुसार झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करावा असे आपण सांगितले होते. त्यासाठी गोवा पोलीस दलाचे पूर्ण सहकार्यही दिले होते.



झेंडावंदन रद्द करावे लागणे हे दुदैर्वी आणि लज्जास्पद आहे. सेंट जॅकिंटो बेटावरील काही व्यक्तींनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय नौदलाकडून राष्ट्रीय ध्वज फडकवण्यावर आक्षेप घेतला आहे. मी याचा निषेध करतो आणि सांगू इच्छितो की माझे सरकार अशा कृत्यांना सहन करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.बेटावरील रहिवाशांनी मात्र म्हटले आहे की आमचा झेंडावंदनास विरोध नाही. मात्र, गावातील रहिवासी झेंडावंदन करतील.

भारतीय नौदलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून, संरक्षण मंत्रालयाने 13 ते 15 आॅगस्ट, 2021 दरम्यान देशभरातील बेटांवर राष्ट्रीय ध्वज फडकवण्याची योजना आखली आहे. नौदलाच्या एका पथकाने उपक्रमाचा भाग म्हणून गोवा नौदल क्षेत्राने साओ जॅसिंटो बेटासह गोव्याच्या बेटांना भेट दिली. तथापि, जॅसिंटो बेटावरील योजना रहिवाशांनी आक्षेप घेतल्याने रद्द करावी लागली.

येथील स्थानिक रहिवासी डॅरेल डिसूझा म्हणाले की बेटावरील रहिवासी दरवर्षी झेंडावंदन करत असतात. परंतु, कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन (सीझेडएमपी) च्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बेटावर नौदलाच्या उपस्थितीला नागरिकांचा विरोध आहे. आम्ही झेंडावंदनास अजितबात विरोध करत नाही. परंतु, सरकारचा डाव आहे की विकासाच्या नावाखाली हे बेट खासगी उद्योजकांच्या घशात घालयाचे आहे.

Navy cancels flag hoisting due to protests by residents, CM warns against anti-India activities

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात