जय श्रीरामच्या घोषणांनी ममतादीदींचे स्वागत; दीदींनी स्वतःहून ओढवून घेतलेली राजकीय कुचंबणा

वृत्तसंस्था

नंदीग्राम – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आज एका छोट्या गल्लीत जय श्रीरामच्या घोषणांनी स्वागत करण्यात आले. ममतादीदी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिवसभर नंदीग्राममध्ये होत्या. त्या एके ठिकाणी आपल्य़ा तृणमूळ काँग्रेसच्या जखमी कार्यकर्त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेल्या होत्या. त्याला निवडणूकीच्या रणधुमाळीत कोणी बेदम मारल्याचे सांगण्यात येते. Nandigram: Slogans of ‘Jai Sri Ram’ raised by BJP supporters as CM Mamata Banerjee was going to visit the house of a TMC worker who was beaten up and injured.

त्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठीच ममतादीदी त्याच्या घरी गेल्या होत्या. त्या गल्लीत शिरताच भाजपचे झेंडे घेतलेल्या काही कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणांनी त्यांचे स्वागत केले. त्याचा विडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे.


यात ममतादीदी व्हिल चेअरवर बसून चिंचोळ्या गल्लीतून कार्यकर्त्यांच्या घराकडे जाताना दिसत आहेत. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर उभे राहून भाजपचे झेंडे घेतलेले काही कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देताना दिसत आहेत. आणि ममतादीदी शांतपणे या घोषणा ऐकत व्हिल चेअरवरून पुढे जाताना दिसत आहेत.

-ममतादीदी जय श्रीरामच्या घोषणांनी का चिडतात…

जय श्रीराम ही साधी घोषणा होती… पण ममतादीदींचे स्वागत त्या घोषणेने का होते… कारण ही कुचंबणा त्यांनी स्वतःहून ओढवून घेतली आहे. ममतादीदींनी राग प्रदर्शित करून या घोषणेला बंगालमध्ये राजकीय ग्लॅमर मिळवून दिले आहे. त्यांनी वेळोवेळी रस्त्यावर घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले असते, तर त्या घोषणेला एवढे राजकीय महत्त्व बंगालमध्ये तरी प्राप्त झाले नसते. पण सामान्यातल्या सामान्य माणसाने जरी जय श्रीरामची घोषणा दिली, तरी त्या चिडल्या. आणि हळूहळू जय श्रीराम या घोषणेचे रूपांतर त्यांना चिडविण्याच्या प्रतिकात होत गेले. आणि आज तीच घोषणा बंगालच्या निवडणूकीतली कोणाला आवडो अथवा न आवडो सगळ्यात मोठी घोषणा ठरली आहे.

या अर्थाने जय श्रीराम ही घोषणेतून ममतादीदींनी स्वतःहून राजकीय कुचंबणा ओढवून घेतली आहे.

Nandigram: Slogans of ‘Jai Sri Ram’ raised by BJP supporters as CM Mamata Banerjee was going to visit the house of a TMC worker who was beaten up and injured.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*