काय आहे केन-बेटवा नदीजोड प्रकल्प?, शेतकऱ्यांचे भाग्य कसे उजळणार?

  • साठी करार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बहुप्रतिक्षीत केन-बेटवा नदीजोड प्रकल्पाच्या करारावर अखेर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील कोट्ववधी शेतकरी, नागरिकांचे भाग्य उजळणार आहे. MP and UP govt. signed river project

केन-बेटवा नदीजोड प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाने मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारबरोबर करार केला. जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी करारावर सह्या केल्या.या प्रकल्पानुसार, दौधन धरण बांधून आणि कालवा खोदून केन नदीतील पाणी बेटवा नदीत सोडता येणार आहे. या प्रकल्पामुळे १०.६२ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून ६२ लाख लोकांना पिण्याचे पाणीही मिळणार आहे. या प्रकल्पातून १०३ मेगावॉट उर्जेचीही निर्मिती केली जाणार आहे.

मध्य प्रदेशातील दुष्काळी बुंदेलखंड भागातील पन्ना, तिकमगड, छत्तरपूर, सागर, दामोह, दातिया, विदिशा, शिवपुरी आणि रायसेन या जिल्ह्यांना पाणी मिळणार असून उत्तर प्रदेशातील बांदा, महोबा, झांशी आणि ललितपूर जिल्ह्यांनाही दिलासा मिळणार आहे. , अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे इतरही नदीजोड प्रकल्प राबविण्यास प्रोत्साहन मिळणार असून देशाच्या विकासात पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा अडथळा येणार नाही, असेही पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

MP and UP govt. signed river project

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*