कोरोनाच्या उपचारासाठी प्रॉव्हिडंट फंडातून काढता येणार पैसे


कोरोना काळात अनेकांना उपचारांसाठी पैशांची गरज भासत आहे. त्यामुळं आता काही अटींसह आता ईपीएफओमधून म्हणजे प्रॉव्हिडंड फडातून कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.Money can be withdrawn from the provident fund for the treatment of corona


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना काळात अनेकांना उपचारांसाठी पैशांची गरज भासत आहे. त्यामुळं आता काही अटींसह आता ईपीएफओमधून म्हणजे प्रॉव्हिडंड फडातून कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कर्मचाºयांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ठरवलेल्या निकषांनुसार कर्मचारी वैद्यकीय कारणांसाठी, नवीन घर घेण्यासाठी, गृहकजार्ची परतफेड आणि लग्नाच्या कारणांसाठी पैसे काढू शकतात.



ज्यांना आपल्या किंवा आपल्या परिवारातील सदस्याच्या कोविड उपचाराच्या उद्देशाने पैसे काढायचे आहेत. त्यांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे.

कोविडमुळे एखादा कर्मचारी किंवा त्याचे पालक, जोडीदार किंवा मुले आजारी पडल्यास सदस्य रक्कम काढू शकतात. कोविडसह इतर वैद्यकीय उपचारांसाठी एखादा कर्मचारी ईपीएफकडून पैसे काढू शकतो.

आपण घर, जमीन खरेदीसाठी खात्यातून 90 टक्के रक्कम काढू शकतो.आपण आपल्या किंवा आपल्या मुलांच्या लग्नासाठी 50 टक्के रक्कम काढू शकतो.जर आपण नोकरी सोडली तर आपल्याला एका महिन्यानंतर 75 टक्के रक्कम तर उरलेली रक्कम दोन महिन्यानंतर काढू शकतो.

Money can be withdrawn from the provident fund for the treatment of corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात