पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या झंझावाती प्रचारसभांनंतर पश्चिम बंगालचा नूरच पालटून टाकला आहे. पश्चिम बंगालमध्ये चुरशीच्या लढतीत भाजपाचाच विजय होणार असल्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या ओपीनियन पोलमधून समोर आला आहे.Modi-Shah rallies turn the tide, survey predicts BJP to win battle in Bengal
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या झंझावाती प्रचारसभांनंतर पश्चिम बंगालचा नूरच पालटून टाकला आहे. पश्चिम बंगालमध्ये चुरशीच्या लढतीत भाजपाचाच विजय होणार असल्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या ओपीनियन पोलमधून समोर आला आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असा सामना आहे. विविध वृत्त वाहिन्यांच्या पोलची सरासरी म्हणजे पोल ऑफ द पोलमध्ये तृणमूलची घसरगुंडी व भाजपचा फायदा असे चित्र दिसून येत आहे. डावे पक्ष व कॉंग्रेसची आघाडी स्पर्धेतही नसणार असल्याचे अंदाज यातून वर्तविण्यात आले आहे.
विविध ओपिनियन पोलची आकडेवारी गोळा करून त्या आकडेवारीच्या विश्लेषणातून एका वृत्तवाहिनीने महाओपिनियन पोल मांडला आहे. २०१६ च्या निवडणुकीत तृणमूलला २११ व भाजपला अवघ्या ३ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाओपिनियन पोलनुसार भाजपला सरासरी १३८ जागा मिळतील, तर तृणमूलला १३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. २९४ जागांसाठी होणाºया निवडणुकीत बहुमतासाठी १४८ चा आकडा आवश्यक आहे. अशा स्थितीत दोन्ही पक्षांमध्ये बहुमतासाठी चढाओढ असेल.
Modi-Shah rallies turn the tide, survey predicts BJP to win battle in Bengal