Modi Govt Big Decision on Corona Vaccination In India, All Above 45 Years will vaccinated From April 1st

Corona Vaccination In India : केंद्राचा मोठा निर्णय, 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस

Corona Vaccination In India : 1 एप्रिलपासून देशातील 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्ण केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे. कोरोना लशीची अजिबात कमतरता नाही.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 1 एप्रिलपासून देशातील 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्ण केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे. कोरोना लशीची अजिबात कमतरता नाही.

या संदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, “1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सर्वांनी त्वरित नोंदणी करून लसीकरण करावे, अशी आमची विनंती आहे.”

सध्या देशात कोरोना महामारीची दुसरी लाट जोरात सुरू आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांतील परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. यामुळे केंद्र व राज्य सरकार कोरोनाविरुद्ध बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लसीकरण सर्वात प्रभावी असल्याचे सरकारचे मत आहे.

आतापर्यंत देशात 4.72 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आलेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 4,72,07,134 डोस देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*