मोदींनी विकासाच्या 115 योजना आणल्या, तर ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये 115 घोटाळे झाले, अमित शहा यांचा हल्लाबोल

बंगालच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 115 योजना आणल्या, तर ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये 115 घोटाळे झाले, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे. Modi brings 115 development plans, Mamata Banerjee’s government has 115 scams, Amit Shah attacks


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : बंगालच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 115 योजना आणल्या, तर ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये 115 घोटाळे झाले, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे.


ममता बॅनर्जींचा तृणमूल कार्यकर्त्यांवर भरवसा नाय, प्रशांत किशोरांची सुटाबुटातील टीम प्रत्येक मतदारसंघात कामाला


पुरुलिया जिल्ह्यात सभेत बोलताना शहा म्हणाले, ममता दीदी तुम्हाला फ्लोराइडयुक्त पाणी देते. एकदा तुम्ही दीदीला सत्तेबाहेर जाण्याचा मार्ग दाखवा, त्यानंतर भाजपा सरकार तुम्हाला 10 हजार कोटी रुपये खर्च करुन तुम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी देईल.  कम्युनिस्टांनी येथे उद्योग सुरू होऊ दिले नाहीत. यानंतर दीदींनी उद्योगांनाही बाहेर ठेवले. तृणमूल काँग्रेस असो किंवा कम्युनिस्ट कोणीही रोजगार देऊ शकत नाही. तुम्हाला रोजगार हवा असेल तर एनडीए सरकारला मतदान करावेच लागेल.

शहा म्हणाले, पंतप्रधान मोदींनी राज्याच्या विकासासाठी ११५ योजना आणल्या. मात्र, त्यांना राज्यात राबविण्यात आल्या नाहीत. यादरम्यान, ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले. राज्यात भाजपा सरकार सत्तेत आल्यास 18 हजार रुपये थेट शेतकºयांच्या खात्यात पाठविले जातील. आदिवासींच्या हितासाठी एक बोर्ड स्थापन करण्यात येईल.  या व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील महिलांसाठी 33 टक्के आरक्षण दिले जाईल.  राज्यभर महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यात येणार आहे.

Modi brings 115 development plans, Mamata Banerjee’s government has 115 scams, Amit Shah attacks

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*