साडी हे भारतीय संस्कृतीतील सभ्यतेचे लक्षण आहे. आमच्या आया-बहिणी साडी परिधान करतात. परंतु, मुद्दामहून सार्वजनिक ठिकाणी साडी वर करून पाय दाखविणे हे सभ्यतेचे लक्षण नाही. महिलांनाही हे आवडत नाही असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. Mamta Didi, showing off her legs in a sari is not a sign of disency and even women are not convinced by it, Dilip Ghosh counters
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : साडी हे भारतीय संस्कृतीतील सभ्यतेचे लक्षण आहे. आमच्या आया-बहिणी साडी परिधान करतात. परंतु, मुद्दामहून सार्वजनिक ठिकाणी साडी वर करून पाय दाखविणे हे सभ्यतेचे लक्षण नाही. महिलांनाही हे आवडत नाही असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ममता बॅनर्जी त्यांच्या फॅक्चर झालेल्या पायाचे भांडवल करत आहेत. गाडीत बसताना पाय घसरून त्या पडल्या होत्या. मात्र, आपल्यावर हल्ला झाल्याचा कांगावा त्यांनी केला होता. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी आरोप केले होते.
रुग्णालयात त्यांच्या पायाला प्लॅस्टर करण्यात आले. त्यानंतर व्हिलचेअरवर बसून त्या प्रचार करत आहेत. मात्र, जाहीर प्रचारसभांमध्ये साडी वर करून पायाचे फॅक्चर दाखवित आहे. यावर टीका करताना घोष म्हणाले होते की साडी परिधान करण्यापेक्षा ममतांनी बम्युर्डा परिधान करावी. यावर तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्यांकडून टीका झाल्यावर घोष यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
घोष म्हणाले, मी माज्या वक्तव्यावर माफी मागत नाही किंवा स्पष्टीकरणही देत नाही. हा महिलांचा अपमान नाही. ममता बॅनर्जी सातत्याने बंगालच्या संस्कृतीची महती गात असतात. पण बंगालच्या संस्कृतीला ममता बॅनर्जींना डाग लावू नये, हाच माज्या वक्तव्यामागचा उददेश आहे. कारण साडी ही आमची संस्कृती आहे, सभ्यता आहे. मात्र, मुद्दामहून कोणी वारंवार सार्वजनिक ठिकाणी साडी वर करत असेल तर ते योग्य वर्तणूक नाही. आमच्या आया-बहिणींना हे पाहून काय वाटत असेल. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीकडून असे वर्तन अपेक्षित नाही.