Mamata mentions Gotra to Attract Hindu voters, It Started tweet war Between BJP-Trinamool

हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी ममतांकडून ‘गोत्रा’चा उल्लेख, भाजप-तृणमूलमध्ये सुरू झाले ट्वीटयुद्ध

Mamata mentions Gotra : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ऐन मतदानाच्या आधी आपले गोत्र जाहीर केल्याने मोठा राजकीय गदारोळ उडाला आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडून रोहिंग्यांच्या राजकारणातील वापर उघड केल्यावर, तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांनी गिरिराज सिंग यांना ‘शेंडीधारी दानव’ संबोधले. ट्वीटयुद्ध हे येथेच थांबलेले नाही. गिरीराज सिंग यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी महुआ मोइत्रा यांना प्रत्युत्तर दिले आहे. प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्याआधी हिंदू मतदारांना लक्ष्य करत ममता बॅनर्जींनी त्या शांडिल्य गोत्रातील असल्याचे सांगितले. Mamata mentions Gotra to Attract Hindu voters, It Started tweet war Between BJP-Trinamool


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ऐन मतदानाच्या आधी आपले गोत्र (Mamata mentions Gotra) जाहीर केल्याने मोठा राजकीय गदारोळ उडाला आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडून रोहिंग्यांच्या राजकारणातील वापर उघड केल्यावर, तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांनी गिरिराज सिंग यांना ‘शेंडीधारी दानव’ संबोधले. ट्वीटयुद्ध हे येथेच थांबलेले नाही. गिरीराज सिंग यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी महुआ मोइत्रा यांना प्रत्युत्तर दिले आहे. प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्याआधी हिंदू मतदारांना लक्ष्य करत ममता बॅनर्जींनी त्या शांडिल्य गोत्रातील असल्याचे सांगितले.

मंगळवारी नंदीग्राममध्ये प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘मी मंदिरात गेले होते, पुजाऱ्याने माझे गोत्र विचारले, मग मी त्यांना सांगितले की, माँ माटी मानुष. या घटनेने मला त्रिपुरातील तिरुपुरेश्वरी मंदिराची आठवण झाली, पुजार्‍यांनी जिथे जिथे माझे गोत्र विचारले तेथे मी त्यांना सांगितले की, माँ माटी आणि मानुष, पण खरं तर माझा गोत्र शांडिल्य आहे.

ममतांच्या या खुलाशावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. गिरीराज सिंह म्हणाले, “मला कधीही गोत्र सांगायची गरज पडली नाही, मी तर लिहितो, पण ममता बॅनर्जी निवडणूक हरण्याच्या भीतीने गोत्र सांगत आहेत. ममता बॅनर्जी आता हेही सांगा की, रोहिंग्या आणि घुसखोरांचेही गोत्र शांडिल्य तर नाही ना!”

गिरीराज सिंह यांच्या या विधानावर तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणतात की, ममतांचे गोत्र रोहिंग्यांचे आहे. अभिमान आहे. हे शेंडीधारी राक्षस वंशापेक्षा कित्येक पटीने चांगले आहे.”

गिरीराज सिंग यांच्यासह अनेक भाजप नेते महुआ मोइत्रा यांच्या या टिप्पणीमुळे संतापले. गिरिराज सिंग यांनी मोईत्रांना उत्तर देताना म्हटले की, “शिखा/शेंडी हे भारताच्या सनातन सभ्यता आणि संस्कृतीचा अभिन्न अंग राहिलेले आहे आणि मतांसाठी सनातनचा गैरवापर करणे योग्य नाही. रोहिंग्यांचे पाय धुवत राहा … लवकरच हिंदुस्तान उत्तर मागेल.”

Mamata mentions ‘Gotra’ to Attract Hindu voters, It Started tweet war Between BJP-Trinamool

विशेष प्रतिनिधी

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*