ममता दिदींच्या हिंसेला ना अंत ना पार : भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह फासावर लटकवला, पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला ; दिदी का ‘खेला ‘ शुरू ?

  • पश्चिम बंगालमध्ये अवघ्या 72 तासात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र जसाजसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे पश्चिम बंगाल मधील हिंसाचार देखील वाढत आहे.
  • आतापर्यंत झालेल्या 130 पेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येला कोण जबाबदार?
  • पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय हिंसाचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत . Mamata Didi’s violence never ends: BJP activist’s body hanged, violence in West Bengal escalates; Didi’s ‘Khela’ started?

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय हिंसाचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. बंगालच्या कूचबिहार लोकसभा क्षेत्रात दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांचा फासावल लटकवलेला मृतदेह आढळला आहे. पक्ष कार्यालयाच्या जवळच त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ही एकप्रकारे अमित सरकार यांची पूर्व नियोजित हत्याच आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय.

Mamata Didi’s violence never ends: BJP activist’s body hanged, violence in West Bengal escalates; Didi’s ‘Khela’ started?

निवडणूक आयुक्तांकडून चिंता व्यक्त

भाजपने या प्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी विशेष पोलीस पर्यवेक्षकाकडे संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला आहे.

कैलाश विजयवर्गीय यांचा तृणमूल काँग्रेसवर निशाणा

भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी या घटनेवरुन तृणमुल काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विजयवर्गीय यांनी ट्विटरवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.

“दीदीचा खेळ सुरु, ममता सरकारचा राजनैतिक हिंसाचाराचा अंत अजूनही झालेला नाही. कूचबिहार लोकसभा क्षेत्रातील दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांना टीएमसीच्या गुंडांनी फासावर लटकवलं. राज्यात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार आहे”, असा आरोप विजयवर्गीय यांनी केलाय.

 

Mamata Didi’s violence never ends: BJP activist’s body hanged, violence in West Bengal escalates; Didi’s ‘Khela’ started?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*