ममतांच्या भाषणाचा एक तीर, तीन निशाण; मोदींवर सॉफ्ट, शाह, राजीव गांधीवर शरसंधान!!


वृत्तसंस्था

कोलकाता : ममतांच्या भाषणात एक तीन निशाण; मोदींवर सॉफ्ट, शाह, राजीव गांधींवर शरसंधान!!… हे काल पश्चिम बंगालच्या विधानसभेत घडले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेत केंद्रीय तपास संस्थांच्या अतिरेकी वापराविरुद्ध एक ठराव बहुमताने मंजूर केला त्यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकाच भाषणातून तीन निशाणे साधली.Mamata Banerjee targets amit shah and rajiv gandhi, but soft on Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी त्यांनी सॉफ्ट कॉर्नर दाखवला. केंद्रीय गृहमंत्रालयावर टीकास्त्र सोडून अमित शाह आणि राजीव गांधी यांना लोकसभेच्या 400 जागा मिळूनही टिकवता आल्या नाहीत, अशी टीका करून काँग्रेस यांच्यावर शरसंधान साधले. एक प्रकारे ममता बॅनर्जी यांनी काल मोठी राजकीय कसरत केली.



सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, सीबीआय, एनआयए आदी केंद्रीय तपास संस्था वेगवेगळ्या राज्यांमध्ये घुसून नेत्यांना अधिकाऱ्यांना त्रास देत आहेत. मग अशा राज्यांमध्ये उद्योगपती गुंतवणूक करणाऱ्या करायला येणार कसे?, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. त्याचवेळी त्या म्हणाल्या, की ईडी अथवा सीबीआय यांचा गैरवापर करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, असे मला वाटत नाही. कारण या दोन्ही तपास संस्था त्यांच्या आखत्यारीत येत नाहीत. त्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. याचा अर्थ मोदी सोडून बाकीचे भाजप नेतेच केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर करून बाकीच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना त्रास देत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत 275 ते 300 जागा मिळवून निवडून येण्याचा भाजपच्या नेत्यांचा अहंकार आहे. पण त्यांनी एक विसरू नये की राजीव गांधी यांना देखील लोकसभेच्या 400 जागा मिळाल्या होत्या. पण त्यांना त्या टिकवता आल्या नाहीत. मी स्वतः, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आदी नेते एकत्र आलो आहोत. आम्ही भाजपशी टक्कर घेऊन त्यांना पराभूत करू. आमच्या राज्यांमध्ये 100 जागांवर भाजपला पराभवच पत्करावा लागेल, दावा त्यांनी केला.

ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणाचा रोख प्रामुख्याने केंद्रीय गृह मंत्रालयावर ठेवला होता. पण त्याचवेळी राजीव गांधी यांचा उल्लेख करून त्यांनी काँग्रेसलाही डिवचले. कारण राजीव गांधींच्या काळात 400 जागा मिळवणारी काँग्रेस आज शंभरीचा आकडाही पार करू शकत नाही, असेच त्यांनी आपल्या भाषणातून ठळकपणे सुचित करून घेतले. त्याचवेळी त्यांनी विरोधकांच्या एकजुटीत आपण काँग्रेसला गृहीत धरत नाही, असा राजकीय संदेशही दिला. ममता बॅनर्जी यांच्या या भाषणाचे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटले असून भाजप आणि काँग्रेस सोडून बाकी सर्व विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या दिशेने त्या जात आहेत का?, असा सवाल या निमित्ताने करण्यात येत आहे.

Mamata Banerjee targets amit shah and rajiv gandhi, but soft on Narendra Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात