पश्चिम बंगालच्या निवडणूक रणधुमाळीत ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीही उतरणार, चाहत्यांचे माहीकडे लक्ष

प्रतिनिधी

कोलकता– सर्व क्रिकेटप्रेमींचा लाडका माही म्हणजेच महेंद्रसिंह धोनी प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार का याची चर्चा सध्या बंगालमध्ये जोरात सुरु आहे. पश्चिकम बंगालमधील खड्गपूर सदर विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार प्रदीप सरकार हे रिंगणात आहेत. विशेष म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे ते अगदी जवळचे मित्र आहेत. त्यामुळे मित्राच्या प्रचाराला ‘कॅप्टन कूल’ येणार का याबाबत उत्सुकता आहे. Mahendrsingh Dhoni will campaign in west Bengal electionकारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात धोनी खड्गपूर रेल्वे स्थानकावर ‘टीटी’चे काम करीत असताना क्रिकेटचा सरावही करीत असे. यातून त्याची आणि प्रदीप सरकार यांची मैत्री झाली. सध्या सरकार आमदार असून २०१९मध्ये या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत प्रदीप सरकार यांनी विजय मिळवित ही जागा भाजपकडून खेचून घेतली होती.

माजी कर्णधार सौरव गांगुली भाजप कडून राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा गेली काही दिवस होती. मोदींच्या सभेत गांगुली भाजप प्रवेश करणार का याकडे लक्ष होते. मात्र या वावड्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता बंगालच्या रणधुमाळीत धोनीची चर्च चवीने केली जात आहे.

Mahendrsingh Dhoni will campaign in west Bengal election

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*