Karnataka elections results : मतमोजणीला सुरुवात भाजपा आणि काँग्रेसमध्ये ‘काँटे की टक्कर’!


सुरुवातीच्या कलात ‘जेडीएस’च्या  पदरात १५-२० जागा

विशेष प्रतिनिधी

बंगळुरु  :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपा आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये कांटे की टक्कर सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर सुरुवातीच्या कलात  कुमारस्वामींच्या जेडीएस पक्षालाही काही मोजक्या जागा मिळताना दिसून आला आहे. कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (१३ मे)  सुरू आहे. Karnataka elections 2023 BJP confident of winning majority Congress says will see after results

या  मतमोजणीच्या  पार्श्वभूमीवर भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून सत्तास्थापनेचा दावा केला जात  आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, ‘’कर्नाटकसाठी आजचा दिवस मोठा आहे. कारण राज्यासाठी जनता निकाल देणार आहे. मला विश्वास आहे की भाजपा पूर्ण बहुमताने विजयी होईल आणि एक स्थिर सरकार देईल.’’ त्यांनी हुबळी येथे हनुमंताचे दर्शनही घेतले.

तर, ’’ आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आणि कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. आम्हाला विश्वास आहे की आम्ही स्वबळावर सरकार बनवू.’’ असा विश्वास काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी व्यक्त  केला आहे.

याशिवाय, ‘’येत्या २-३ तासांत चित्र  स्पष्ट होईल. एक्झिट पोल दाखवतात की दोन्ही राष्ट्रीय पक्ष मोठ्या प्रमाणात स्कोअर करतील. एक्झिट पोलने JD(S) ला 30-32 जागा दिल्या आहेत. मी एक छोटा पक्ष आहे, माझ्यासाठी कोणतीही मागणी नाही.. मला चांगल्या विकासाची आशा आहे.’’ असे जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामींनी सांगितले आहे.

कोणता पक्ष किती जागांवर आघाडीवर?

भाजपा – 79

काँग्रेस – 117

जेडीएस – 27

इतर – 05

Karnataka elections 2023 BJP confident of winning majority Congress says will see after results

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात