भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांची प्रकृती गंभीर


विशेष प्रतिनिधी

लखनौ – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह (वय ८९) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. ही माहिती संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या निवेदनात दिली आहे.Kalyan singh on ventilator support

राम मंदिर निर्माण लढ्यात सक्रीय सहभाग असलेले कल्याणसिंह हे भाजपचे उत्तर प्रदेशातील एकेकाळचे सर्वांत लोकप्रिय नेते राहिलेले आहेत. उत्तर प्रदेशसारख्या महत्वाच्या राज्यात मुख्यमंत्रीपदाती जबाबदारी पार पाडताना



त्यांनी भाजप पक्ष म्हणून तसेच संघटना म्हणून मजबूत करण्यात तसेच लोकप्रिय करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. उत्तर भारतात भाजपची लोकप्रियता वाढण्यामध्ये ज्या नेत्यांचा वाटा आहे

त्यामध्ये कल्याणसिंह यांचे नाव अग्रक्रमावर घेतले जाते. सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर कल्याणसिंह यांनी राज्यपालपदाची जबाबदारीही पार पाडली होती.

दक्षता विभागात वरिष्ठ डॉक्टरांसह संस्थेचे संचालक प्रा. आर. के. धिमन यांचे कल्याणसिंह यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. संसर्ग आणि शुद्ध हरपल्याने त्यांना ४ जुलै रोजी रुग्णालयात दाखल केले होते. त्याआधी त्यांच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते.

Kalyan singh on ventilator support

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात