वृत्तसंस्था
श्रीनगर : अमरनाथ यात्रेसाठी यंदा जम्मू – काश्मीरच्या प्रशासनाने २०१९ पेक्षा दुप्पट तयारी केली आहे. २०२१ मधील अमरनाथ यात्रेसाठी तब्बल ६ लाख भाविकांची नोंदणी अपेक्षित आहे.J&K prepares for Amarnath Yatra, 6 lakh pilgrims expected
२०१९ मध्ये ३ लाख ४२ हजार भाविकांनी अमरनाथ यात्रा केली होती. त्याच्या आधी २०१८ मध्ये २ लाख ८५ हजार भाविकांनी अमरनाथ यात्रा करून बाबा अमरनाथाचे दर्शन घेतले होते.
२०२० मध्ये कोरोनाचा प्रकोप असताना अमरनाथ यात्रा होऊ शकली नव्हती. यंदा मात्र यात्रेच्या नोंदणीत सुरूवातीपासूनच उत्साह दिसून येत आहे. २२ जून २०२१ ते २८ ऑगस्ट राखी पौर्णिमेपर्यंत अर्थात श्रावण पौर्णिमेपर्यंत ५६ दिवस ही यात्रा चालेल.
भाविकांसाठी ४१४ किलोमीटरच्या मार्गावर ६ ठिकाणी ट्रँझिट कँम्प तयार करण्यात येऊन सुमारे १.२२ लाख भाविकांची एका वेळी या कँम्पमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
J&K prepares for Amarnath Yatra, 6 lakh pilgrims expected
Read @ANI Story | https://t.co/AtsAnfcQ0P pic.twitter.com/cERpvIMSDW
— ANI Digital (@ani_digital) March 25, 2021
कोविड प्रोटोकॉल पाळून भाविकांसाठी वैद्यकीय सुविधाही देण्यात येणार असून यात्रा मार्गावर सुरक्षा व्यवस्था १५ मार्चपासूनच तैनात करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी अमरनाथ देवस्थान समितीच्या सदस्यांसमवेत झालेल्या बैठकीत भाविकांसाठी एकूण व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थांचा आढावा घेतला.