तामिळनाडूचा सुगंधी मोगरा मीडिया ग्लॅमरपासून दूरच; मोगरा उत्पादकांकडे कोणी देईना लक्ष; सुगंधी उद्योग उभारण्याची मोठी संधी, पण…


वृत्तसंस्था

मदुराई :  विधानसभा निवडणूकीच्या गदारोळात बड्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांकडे, मोठमोठ्या रॅल्या, पदयात्रांकडे सगळ्यांचे लक्ष असते. त्यांचे रिपोर्टिंग होते, पण स्थानिक प्रश्नांवर ज्या निवडणूका केंद्रीत असतात, त्याच्या रिपोर्टिंगकडे फारसे कोणाचे लक्ष जात नाही.jasmine growers demand the establishment of a perfume manufacturing unit

नेमकी हीच खंत तामिळनाडूतील मोगरा उत्पादकांनी व्यक्त केली आहे. मदुराई जिल्ह्यातील उशीलमपट्टी हा तामिळनाडूमधील छोट्य़ा शेतकऱ्यांचा भाग आहे. तेथील शेतकरी मोगरा उत्पादन करतात. पण या पारंपरिक शेतीकडे कोणाचे लक्ष नसल्याची खंत येथील महिला शेतकरी व्यक्त करतात.आम्हाला मोगरा शेतीत बारमाही पाण्याची गरज आहे. ते पुरविण्याची जबाबदारी कोणी घेत नाही. येथे सुंगध उद्योगाला मोठी संधी आहे पण त्याकडेही कोणाचे लक्ष नाही. आम्ही कधी मोगरा निर्यात करतो. त्याचा भाव कधी चांगला मिळतो, कधी भाव पडतो.

त्यामध्ये नियमितता नाही. उशीलमपट्टीतच सुगंधाची फॅक्टरी उभारली, तर आम्ही तेथेच थेट मोगरा विक्री करून त्याची योग्य किंमत मिळवू शकतो, असे शेतकरी महिलांनी स्पष्ट केले.

तामिळनाडूच्या सर्व राजकीय पक्षांचे जाहीरनामे एकत्र केले तर १०० पाने सहज भरतील. पण त्यापैकी एकातही मोगरा उत्पादकांवर एकही ओळ लिहिलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्होकल फॉर लोकलची घोषणा केली. देशी खेळण्यांसाठी क्लस्टर उभी राहात आहेत. त्याच प्रमाणे मोगरा उत्पादकांकडेही त्याच धर्तीवर लक्ष देण्याची गरज आहे.

चहामळ्यांना मीडिया ग्लॅमर

आसाममध्ये चहाच्या मळ्यात जाऊन बडी नेतेमंडळी फोटो काढून घेण्यासाठी का होईना पाने खुडतात. चहा मजूर महिलांशी गप्पा मारतात. त्यामुळे त्यांच्या समस्या जरी पूर्ण सुटल्या नाहीत, तरी चहाच्या मळ्यांना आणि मजूरांना मीडिया ग्लॅमर मिळाले ही वस्तुस्थिती आहे.

पण सुगंधी उद्योगात महत्त्वाचा घटक ठरणारा मोगरा मात्र या ग्लॅमरपासून अद्याप अलगच राहिलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. निवडणूकीच्या निमित्ताने का होईना कोणाचे याकडे लक्ष जावे, याची हा मोगरा आणि मोगरा उत्पादक शेतकरी वाट पाहात आहेत.

jasmine growers demand the establishment of a perfume manufacturing unit

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी