केरळमध्ये लव्ह जिहाद; कुख्यात आयएआय़एस संघटनेचे म्होरके हिंदू – ख्रिश्चन मुलींचे विवाह लावून जोडप्यांना सिरियात पाठवून देतात!!

केवळ भाजपच नाही, तर हिंदू आणि ख्रिश्चन समाजालाही लव्ह जिहाद गंभीर मुद्दा वाटतोय; के. सुरेंद्रन यांचे प्रतिपादन


वृत्तसंस्था

तिरूअनंतपूरम – केरळच्या निवडणूकीत लव्ह जिहादचा मुद्दा तापत असताना प्रियांका गांधी यांनी त्यावर मलमपट्टी करणारे शांतता आणि सौहार्द मंत्रालय स्थापनेची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे भाजपच्या बरोबरीने हिंदू आणि ख्रिश्चन समाजही लव्ह जिहादच्या मुद्दयावर स्वतंत्रपणे एकवटत आहेत. ISIS is targeting Hindu-Christian girls especially students. Why are they sending couples to Syria, Kerala BJP chief K Surendran

केरळमध्ये लव्ह जिहादच्या अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. पण एलडीएफ सरकारने त्यांची चौकशीच न केल्याने त्या बाहेर आल्या नाहीत. त्यांना वाचा फुटलेली नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी सांगितले. लव्ह जिहाद विरोधातील भावना फक्त भाजपची नाही. तर राज्यातल्या हिंदू आणि ख्रिश्चन समाजांना देखील त्यातले गांभीर्य जाणवले आहे.

आयएसआयएस अर्थात इसिस या कुख्यात इस्लामी दहशतवादी संघटनेचे म्होरके हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना टार्गेट करतात. त्यांचे विवाह मुस्लीम मुलांशी लावून देतात. आणि त्या जोडप्यांना सिरियामध्ये पाठवून देतात. हा ट्रेंड केरळमध्ये सुरू आहे, असा आरोपही सुरेंद्रन यांनी केला आहे.

राज्यात भाजप सत्तेवर आला तर लव्ह जिहाद विरोधातील कायदा प्राधान्याने लागू करण्यात येईल आणि त्याला हिंदू आणि ख्रिश्चन समाजांचा पाठिंबा मिळेल, असे सुरेंद्रन यांनी स्पष्ट केले. लव्ह जिहादविरोधात ख्रिश्चन धर्मगुरूंनी आवाज उठविल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

-मुख्यमंत्र्यांच्या मुलीचे दुसरे लग्न

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांची मुलगी वीणा हिचा नुकताच दुसरा विवाह झाला आहे. डीवायएफआयचा नेता महंमद रियाझ याच्याशी झाला आहे. दोघांचाही दुसरा विवाह आहे. त्यांचे आपापल्या जोडीदारांबरोबर घटस्फोट झाले आहेत. त्या दोघांनी एकमेकांच्या पसंतीने विवाह केला आहे. या विवाहाची केरळमध्ये जोरदार राजकीय चर्चा आहे.

ISIS is targeting Hindu-Christian girls especially students. Why are they sending couples to Syria, Kerala BJP chief K Surendran

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*