इशरत जहाँ दहशतवादीच होती; चकमक प्रकरणात तीनही पोलीस अधिकाऱ्यांची सीबीआय कोर्टाकडून निर्दोष सुटका


वृत्तसंस्था

अहमदाबाद :  लष्कर ए तैयबाची दहशतवादी इशरत जहाँ हिच्या २००४ च्या चकमक प्रकरणातून तीन पोलीस अधिकऱ्यांची सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निर्दोष सुटका केली. इशरत ही दहशतवादी होती, हे विसरून चालणार नाही, असे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले.Ishrat jahan encounter case; CBI court discharges three police officers

गुन्हे शाखेचे तीन अधिकारी तरुण बारोट, अंजू चौधरी आणि गिरीश सिंघल यांची सर्व आरोपातून तब्बत १७ वर्षांनी सुटका करण्यात आली आहे. इशरत जहाँ लष्कर-ए-तैयबाची दहशतवादी होती. ती त्यांच्या परकीय भूमीत बसलेल्या मास्टर्सच्या आदेशानुसार भारतात दहशतवादी कृत्यांच्या योजनेत सामील होती.तिच्याबाबतचा इंटेलिजन्स रिपोर्ट इतका मजबूत आहे, की तो नाकारता येणार नाही आणि म्हणूनच तीनही अधिकाऱ्यांना चकमक प्रकरणात निर्दोष सोडण्यात आले आहे.

गुन्हे शाखेचे अधिकारी जी.एल. सिंघल, तरुण बारोट आणि अंजू चौधरी यांनी आयबीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अचूक कारवाई केली. या चकमकीत चौघा दहशतवाद्यांसमवेत इशरत मारली गेली. या अधिकाऱ्यांनी जे करायला हवे होते तेच केले, असेही न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट म्हटले आहे.

यूपीए सरकारच्या काळातील कारवाई

१५ जून २००४ रोजी गुजरातच्या पोलिसांनी इंटेलिजन्स ब्यूरोच्या माहितीच्या आधारे चकमकीत चार जणांना ठार केले. यामध्ये इशरत जहाँ, जावेद गुलाम शेख, अमजद अली राणा आणि झीशान जोहर यांचा समावेश होता. या चकमकीचे नेतृत्व डीआयजी डीजी वंजारा यांनी केले.

मात्र, या चकमकीवरून प्रचंड राजकीय वाद माजविण्यात आला. इशरत जहाँ दहशतवादी नव्हतीच इथपर्यंत म्हणण्याची काही राजकीय नेत्यांची आणि मानवाधिकार संघटनांची मजल गेली. इशरतला निरपराध आणि पोलीसांनाच अपराधी ठरविण्याची चढाओढच यूपीएच्या राजवटीत चालली होती.

त्या वादामुळे ७ सप्टेंबर २००९ रोजी मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी एस.पी. तमंग यांना चौकशी सोपविण्यात आली. त्यांनी २४३ पानांचा अहवाल न्यायालयात सादर केला. यात इशरत जहाँ चकमक बनावट घोषित करण्यात आली. थंड डोक्याने केलेल्या हत्येप्रकरणी पोलिसांना दोषी ठरविण्यात आले.

परंतु, इंटेलिजन्स ब्यूरो आपल्या माहितीवर ठाम होता. ही माहिती गोपनीय असली, तरी ब्यूरोने ती सीबीआय न्यायालयात सादर केली. यानंतर तब्बल १७ वर्षांनी तीनही पोलीस अधिकाऱ्यांची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली आहे.

Ishrat jahan encounter case; CBI court discharges three police officers

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था