भारताचा दणदणीत विजय तर पदार्पणाच्या सामन्यातच कृणालचा विश्वविक्रम ! तुफानी अर्धशतक ; बनला पहिलाच क्रिकेटर

विशेष प्रतिनिधी

पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेला गहुंजे येथे सुरुवात झाली. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर मालिकेतील तिन्ही सामने खेळविले जातील. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. वनडे पदार्पण करणाऱ्या कृणाल पंड्याने तुफानी अर्धशतक झळकावत सर्वांची मने जिंकली. सोबतच नवा विश्वविक्रम आपल्या नावे केला. India’s resounding victory, Krunal’s world record in his debut match! Stormy half-century; Became the first cricketerकृणालचा कारनामा

भारतीय संघासाठी पहिल्या सामन्यात कृणाल पंड्या व प्रसिद्ध कृष्णा यांनी वनडे पदार्पण केले. कृणालने आपल्या पहिल्याच वनडे सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने २६ चेंडूत अर्धशतक झळकावून, वनडे पदार्पणात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विश्वविक्रम केला. कृणालने ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३१ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. यासोबतच पदार्पणात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक झळकवणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला.

India’s resounding victory, Krunal’s world record in his debut match! Stormy half-century; Became the first cricketer

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*