कोरोना प्रतिबंधक लसीसाठी भारतीयांनाच प्राधान्य, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची ग्वाही


कोरोना प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून भारताने सुरू केलेला लस उपक्रम स्थगित करून भारतीयांनाच लसीसाठी प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. कोरोना लसीची निर्यात का केली असा प्रश्न करणे बेजबाबदारपणाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.Indians are preferred for corona vaccine, says External Affairs Minister Testimony of Jaishankar


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून भारताने सुरू केलेला लसमैत्री उपक्रम स्थगित करून भारतीयांनाच लसीसाठी प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे.

कोरोना लसीची निर्यात का केली असा प्रश्न करणे बेजबाबदारपणाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.देशात कोरोनाचा संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जगातील इतर देशांना कोराना प्रतिबंधक लस पुरविण्यात येत होती.



परंतु, देशात लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणीला प्राधान्य दिले जाईल, असे एस. जयशंकर यांनी सांगितले. त्याचबरोबर कोरोना लसीसाठीचा कच्चा माल भारताला सुरळितपणे मिळेल यासाठी मोठ्या देशांनी मदत करावी,

असे आवाहन त्यांनी केले. जयशंकर म्हणाले, माझे सर्व देशांना त्यातही मोठ्या देशांना आवाहन आहे की कोरोना लसीचे उत्पादन सुरळित ठेवण्यासाठी कच्चा मालाचा पुरवठा करावा.

जयशंकर म्हणाले तुम्ही कोरोना लसीची निर्यात का केली असे अनेक जण विचारत आहे. मात्र, असे विचारणे खूपच अल्पदृष्टी विचार आहे. केवळ बेजबाबदार लोकच असा प्रश्न विचारू शकता.जागतिक व्यवस्थेत प्रत्येक देशाला एकमेंकांवर अवलंबून राहवे लागतो. कोणीही स्वयंपूर्ण नसतो.

Indians are preferred for corona vaccine, says External Affairs Minister Testimony of Jaishankar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात