Indian Railway Recruitment 2021 vacancy for 10th pass apply now

Indian Railway Recruitment 2021 : 10वी पास तरुणांसाठी रेल्वेत भरती, विना परीक्षा मिळेल नोकरी, आज अखेरचा दिवस

Indian Railway Recruitment 2021 : सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रेल्वेने अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याचा आज म्हणजे 31 मार्च रोजी अखेरचा दिवस आहे. इच्छुक उमेदवारांना आजच अर्ज करावा लागेल. भारतीय रेल्वेच्या डिझेल लोको मॉडर्नायझेशन वर्क्स (DLMW) मध्ये अप्रेंटिस पदांवर भरती काढली आहे. योग्य उमेदवार अधिकृत वेबसाइट dmw.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. भारतीय रेल्वेद्वारे काढण्यात आलेल्या या भरतीअंतर्गत 182 पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. Indian Railway Recruitment 2021 vacancy for 10th pass apply now


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रेल्वेने अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याचा आज म्हणजे 31 मार्च रोजी अखेरचा दिवस आहे. इच्छुक उमेदवारांना आजच अर्ज करावा लागेल. भारतीय रेल्वेच्या डिझेल लोको मॉडर्नायझेशन वर्क्स (DLMW) मध्ये अप्रेंटिस पदांवर भरती काढली आहे. योग्य उमेदवार अधिकृत वेबसाइट dmw.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. भारतीय रेल्वेद्वारे काढण्यात आलेल्या या भरतीअंतर्गत 182 पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

महत्त्वाच्या तारखा…

ऑनलाइन अर्जांची सुरुवात – 12 मार्च 2021
ऑनलाइन अर्जांची अंतिम तारीख – 31 मार्च 2021

पदांचे विवरण…

इलेक्ट्रिशियन – 70 पदे
मेकॅनिक – 40 पदे
मशिनिस्ट – 32 पदे
फिटर – 23 पदे
वेल्डर – 17 पदे

पात्रता काय…

भारतीय रेल्वेने काढलेल्या भरतीअंतर्गत इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, मशीनिस्ट आणि फिटरच्या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारां का 50% गुणांसह 10वी पास असणे अनिवार्य आहे. सोबतच संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणेही गरजेचे आहे. दुसरीकडे, वेल्डरच्या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 8वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. वेल्डिंग ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणेही अनिवार्य आहे.

वयोमर्यादा

भारतीय रेल्वेमधील भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा 15 वर्षांहून 24 वर्षांदरम्यान असली पाहिजे. निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंगदरम्यान 7000 रुपये स्टायपेंडच्या रूपात मिळतील. यासोबतच 2 वर्षांसाठी ट्रेनिंगदरम्यान उमेदवारांना 7700 रुपये प्रति महिना आणि 3 वर्षांसाठीच्या उमेदवारांनी 8050 रुपये प्रति महिना देण्यात येईल.

Indian Railway Recruitment 2021 vacancy for 10th pass apply now

अधिकृत सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*