India vs England 1st Odi इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्याची शानदार कामगिरी

  • इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय (india vs england 1st odi) सामन्यात पदार्पणवीर कृणाल पंड्या (krunal pandya) आणि प्रसिद्ध कृष्णाने (prasidha krishna) अफलातून कामगिरी केली.india vs england 1st odi debutants Krunal Pandya and prasidha Krishna performed brilliantly

विशेष प्रतिनिधी

पुणे : टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या सामन्यात (india vs england 1st odi) 66 धावांनी शानदार विजय मिळवला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव 251 धावांवर आटोपला.

या सामन्यात टीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी विजयी कामगिरी केली. प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्या या दोघांनी अफलातून खेळी केली. या दोघांनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली.

कृणाल पंड्याची अष्टपैलू कामगिरी
कृणालने पदार्पणातील सामन्यात वेगवान अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली. कृणालने इंग्लंडच्या जॉन मॉरीस यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. मॉरीस यांनी 1990 मध्ये 35 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. तर कृणालने 26 चेंडूत वेगवान अर्धशतक पूर्ण केलं.कृणालने एकूण 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 58 धावांची खेळी केली. तसेच बोलिंग करताना कृणालने 1 विकेटही घेतली. कृणालने सॅम करनला आऊट केलं. कृणालची ही पहिली विकेट ठरली.

india vs england 1st odi debutants Krunal Pandya and prasidha Krishna performed brilliantly

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*