IND Vs AUS कसोटीला पीएम मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची उपस्थिती, मोदी नाणेफेकीसह कॉमेंट्रीही करताना दिसण्याची शक्यता


प्रतिनिधी

अहमदाबाद : अहमदाबाद कसोटी सामना 9 मार्चपासून सुरू होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताला मालिका आपल्या नावावर करण्याची संधी असेल, तर ऑस्ट्रेलियासमोर मालिका बरोबरी करण्याचे आव्हान आहे. हा रोमहर्षक सामना एकापेक्षा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण आहेत- दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी.IND Vs AUS Test Attendance of PM Modi and Australian Prime Minister, Modi likely to be seen doing commentary along with coin toss

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मॅचमध्ये पीएम मोदी नाणेफेक करताना दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय ते कॉमेंट्रीही करताना दिसतील असे सांगितले जात आहे. यात त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजही असतील. अँथनी अल्बानीज अहमदाबादला पोहोचले आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दुसरीकडे, अहमदाबाद कसोटीत पंतप्रधान मोदी येणार असल्याने स्टेडियममध्ये सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.



केवळ होळीच नाही तर अहमदाबाद शहर आणखी एका सणाच्या रंगात रंगले आहे, त्याचे कारण आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या भेटीसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी टॉस करतील, कॉमेंट्रीही करतील

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनावेळी 1,10,000 क्षमतेच्या स्टेडियमला ​​भेट दिली होती, परंतु नामांतरानंतर ते येथे कसोटी सामना पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल. अहमदाबादमध्ये 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात पंतप्रधान मोदींची उपस्थिती अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरणार आहे.

एक लाखापर्यंत प्रेक्षक पोहोचण्याची शक्यता

मोदींची उपस्थिती पाहता स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने (एसपीजी) स्टेडियमची जबाबदारी घेतली असून पहिल्या दिवशी एक लाख प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ख्रिसमस कसोटी सामन्यांदरम्यान ईडन गार्डन्सवर सर्वाधिक प्रेक्षक (88000 ते 90000) उपस्थित होते म्हणून हा भारतातील एक विक्रम असेल.

रोहित शर्मा म्हणाला – रोमांचक होईल सामना

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंवर कोणता अतिरिक्त दबाव असेल का? या प्रश्नावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, आमचे लक्ष कामगिरीवर आहे. ते म्हणाले, दोन्ही देशांचे पंतप्रधान येत आहेत. हे रोमांचक असेल, पण खेळाडूंचे लक्ष खेळावर असेल. ही कसोटी जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले – ही भेट ऐतिहासिक

दुसरीकडे अहमदाबादला पोहोचलेले ऑस्ट्रेलियन पीएम अँथनी यांनी भारताचा दौरा ऐतिहासिक असल्याचे सांगितले. 4 दिवसांच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून ते येथे पोहोचले असून 25 मोठ्या उद्योगपतींना सोबत घेऊन आले आहेत. ऑस्ट्रेलियन उद्योगांसाठी भारत अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांचे मत आहे.

IND Vs AUS Test Attendance of PM Modi and Australian Prime Minister, Modi likely to be seen doing commentary along with coin toss

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात