एकट्या त्रिपुरामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत 700 कोटी रुपयांचे वाटप, 1 लाख 47 हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचले पैसे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीणच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला. रविवारी दुपारी 1 लाख 47 हजारांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्ता पाठविण्यात आला 38 हजार रुपयांचा पहिला हप्ता मोदींच्या हस्ते पाठविण्यात आला. एकूण 700 कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.In Tripura alone, Rs 700 crore has been allocated under the Prime Minister’s Housing Scheme, 1 lakh 47 beneficiaries have received the money.

पंतप्रधान मोदींनी आभासी माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधला. हे पैसे इतर कुठेही खर्च करू नका, घर बांधा, जसजसे घर बांधाल, तुमचे पुढचे हप्तेही खात्यावर जमा होतील, असे मोदी म्हणाले.



लाभार्थ्यांना घरकुल योजनेत नाव यावे यासाठी तुमच्याकडे कोणी पैसे मागितले का, असा प्रश्नही पंतप्रधांनी विचारला. तुमचा हक्क मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे. कोणीही तुमचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. आधीचे सरकार टक्केवारीशिवाय कोणताच लाभ देत नव्हते, पण आता तसे नाही, असेही त्यांनी सांगितले.

In Tripura alone, Rs 700 crore has been allocated under the Prime Minister’s Housing Scheme, 1 lakh 47 thousand beneficiaries have received the money.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात