आर्थिक शिस्तीतून तुटीला लगाम, वाढीची संधी; आनंद महिंद्रांकडून मोदी सरकारच्या बजेटचे कौतुक; वाचा त्यांच्याच शब्दांत!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 24 च्या मांडलेल्या अर्थसंकल्पाचे प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करून त्यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. आनंद महिंद्रा हे आपल्या परखड आणि सटीक कमेंट साठी नेहमीच ओळखले जातात. In line with our conservatism, it was good to see us back on a trajectory towards a lower fiscal deficit.

या ट्विट मधून आनंद महिंद्रा म्हणतात :

अर्थसंकल्पावर मत व्यक्त करण्यासाठी मी एक दिवस थांबत असतो. अर्थसंकल्पातील सगळे तपशील समजावून घेतो आणि मगच प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. प्रथमच मी हे सांगू इच्छितो, की आज जागतिक पातळीवर भारत ही एकच अर्थव्यवस्था सध्या चांगल्या अवस्थेत आणि भविष्यवेधी राहिली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची ही प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. ते आव्हान अर्थसंकल्पाने निश्चितपणे पेलले आहे. त्यामुळे मी समाधानी आहे. अर्थसंकल्पातून मोठ्या गुंतवणूक वाढीचा आशावाद व्यक्त झाला आहे.

दुसरे म्हणजे आपल्या अर्थ मंत्रालयाचा जो डीएनए आहे, तो म्हणजे आर्थिक शिस्त पाळणे आणि आर्थिक उधळपट्टी अथवा दिवाळखोरी टाळणे हा आहे. आज आपले सर्व शेजारी देश दिवाळखोर झाले असताना भारत मात्र आर्थिक शिस्तीच्या वाटेवर वाटचाल करतो आहे. अर्थसंकल्पात हा पारंपरिक दृष्टिकोन निश्चित योग्य पद्धतीने पाळला आहे.

आर्थिक शिस्तीचा पारंपरिक दृष्टिकोन ठेवून भारत वित्तीय तूट कमीत कमी राखण्याकडे वाटचाल करतो आहे हे पाहून निश्चित समाधान वाटते. पण त्याच वेळी सरकारने आता निर्गुंतवणूक धोरण वेगाने अमलात आणले पाहिजे. त्यामुळे विकासासाठी जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतील. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आज नव्या आर्थिक स्रोतांची मोठी गरज आहे.

In line with our conservatism, it was good to see us back on a trajectory towards a lower fiscal deficit.

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात