गोव्यात माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो निघाले ममतांच्या तृणमूळ काँग्रेसच्या दिशेने; काँग्रेसच्या आमदारकीचा दिला राजीनामा


वृत्तसंस्था

पणजी : भाजपशी लढण्याच्या राणा भीमदेवी थाटातल्या बाता करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या प्रत्यक्षात भाजपवर फक्त शाब्दिक हल्ले किंवा भाजप नेत्यांवर शारीरिक हल्ले चढवत आहेत पण त्या काँग्रेस मूळापासून उखडत आहेत. याचे प्रत्यंतर आसामनंतर गोव्यात आले आहे.In Goa, former Chief Minister Luizino Falero headed towards Mamata’s Trinamool Congress; Congress MLA resigns

आसाम मध्ये त्यांनी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांना काँग्रेसमधून फोडून तृणमूल काँग्रेस मध्ये घेतले. आता गोव्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो हे काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या दिशेने निघाले आहेत.



फालेरो यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा आज सादर केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका विशद केली. आज काँग्रेस पक्ष विभाजित कुटुंब बनला आहे. ममता बॅनर्जी, शरद पवार यांच्याही काँग्रेस आहेत. त्या खऱ्या आहेत. काँग्रेस पक्ष बळकट करण्याची खऱ्या अर्थाने देशात गरज आहे. या दृष्टीने मी काम करणार आहे, असे ते म्हणाले.

काल पश्चिम बंगालमध्ये प्रचार सभेत ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी आम्ही गोव्यात देखील भाजपशी टक्कर घेऊन सरकार आणू, असा दावा केला होता. याचेच हे प्रत्यंतर आहे. लुईजिनो फालेरो आता ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या दिशेनेच निघाल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. आसाममध्ये सुष्मिता देव यांच्या रूपाने ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसला चेहरा दिला आहे. कदाचित लुइजिनो फालेरो यांच्या रूपाने गोव्यात त्या तृणमूळ काँग्रेसला चेहरा देतील, असे मानले जात आहे.

In Goa, former Chief Minister Luizino Falero headed towards Mamata’s Trinamool Congress; Congress MLA resigns

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात